आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाईकचे सोशल मीडियावर समर्थनाचे प्रयत्न, उद्या करणार प्रेस कॉन्फरन्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बांगलादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर वादात अडकलेला मुस्लिम धर्मोपदेशक झाकीर नाईक याने सोशल मीडियावर समर्थन मिळविण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे त्याचे शीर आणून देणाऱ्याला साध्वीने बक्षिस जाहिर केले आहे.
नाईक सुरुवातीपासून फेसबुकवर आहेत, आता त्यांनी नवे ट्विटर हँडल सुरु केले आहे. झाकीर 14 जुलैला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मीडियाला सामोरे जाणार आहेत. त्याआधी त्यांनी #SupportZakirNaik या हॅशटॅगने आपल्या समर्थनार्थ लिहिण्याचे आवाहन केले आहे.
ऑनलाइन समर्थन मिळविण्यासाठी झाकीर नाईक यांनी लिहिले, 'सर्व बंधु आणि भगिणींना मी झाकीर नाईक मीडिया ट्रायल विरोधात #SupportZakirNaik हॅश टॅगने समर्थन करण्याचे आवाहन करतो. सत्याचा विजय झाला पाहिजे.'

दोन दिवसांपूर्वीच भारतात येण्याचे टाळून झाकिर नाईक ट्विटरवर सक्रिय झाला आहे. त्याने त्याच्या पहिल्या ट्विटमध्ये लिहिले आहे. 'दहशतवाद हा कोणत्याही एका धर्माचा एकाधिकार नाही. इस्लाम निरपराध लोकांच्या हत्येचा विरोध करतो.' त्याने पुढे लिहिले आहे, 'माझ्या कोणत्याही वक्तव्याचा विपर्यास करणे आणि हिंसेसाठी त्याला योग्य ठरविणे याचा मी जाहीर निषेध करतो.'
नाईक यांनी मीडिया ट्रायलवरही भरपूर ट्विट केले आहेत. एका ट्विटमध्ये म्हटले आहे, 'न्यूज चॅनलचे काम पुराव्यांवर आधारित बातम्या देणे असते. ना की खोट्या माहिती आधारे जजमेंट पास करणे.'
पुढील स्लाइडमध्ये पाहा, झाकीर नाईकचे ट्विट..
बातम्या आणखी आहेत...