आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाकीर नाईकचा काँग्रेसला चंदा; राजीव गांधी फाउंडेशनला 50 लाखांची देणगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/ मुंबई- डॉ.झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या राजीव गांधी फाउंडेशनला (आरजीएफ) कथितरीत्या ५० लाख रुपयांची देणगी दिल्यावरून राजकीय वादळ उठले आहे.

नाईकच्या देशविरोधी कारवाया झाकता याव्यात म्हणून आरजीएफला दिलेली ५० लाखांची कथित देणगी ही लाच असल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपने काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्यासाठी चिखलफेक करण्याचा विखारी कट रचला असल्याचा पलटवार काँग्रेसने केला आहे.

>नियम- कायद्यानुसारराजीव गांधी फाउंडेशनला देणगी मिळाली होती. डॉ. नाईकशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर ती परत केली, ही वस्तुस्थिती आहे.
-रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते

>इस्लामिक रिसर्चफाउंडेशनला संरक्षण देण्यासाठीच राजीव गांधी फाउंडेशनला ५० लाखांची
देणगी हीे लाचच होती.
-रविशंकर प्रसाद, केंद्रीय मंत्री

पुढील स्लाइडवर वाचा, नाईकचा कांगावा : माझ्यावर कारवाई हा मुस्लिमांवर हल्ला

बातम्या आणखी आहेत...