आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रमार्गे जग प्रदक्षिणेस निघाल्या नौदलाच्या 6 रणरागिणी; 200 दिवस, 22 हजार मैलांचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- भारतीय नौदलाच्या ६ महिला अधिकाऱ्यांचे पथक रविवारी जग प्रदक्षिणेसाठी रवाना झाले. २०० दिवसांच्या सागरी प्रवासादरम्यान ही टीम २२ हजार मैल अंतर कापेल. संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी पणजी किनाऱ्यावरून हिरवी झेंडी दाखवून टीमला रवाना केले. लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी मोहिमेचे नेतृत्व करत आहेत. ही टीम फ्रीमेंटल (ऑस्ट्रेलिया), लिटेल्टन (न्यूझीलंड), पोर्ट स्टॅनले (फॉकलंड) आणि केप टाऊन (द. आफ्रिका) होत गोव्याला परतेल. या चार टप्प्यांत सर्वाधिक ४५ दिवसांचे अंतर न्यूझीलंड व फॉकलंडदरम्यान आहे.

आयएनएसव्ही तारिणी; सर्व महिला कर्मचारी असलेली जगातील एकमेव लष्करी नौका
- सर्व कर्मचारी महिलाच असलेली तारिणी ही जगातील पहिली आंतरराष्ट्रीय लष्करी नौका आहे. या स्वदेशी नौकेची उंची ५५ फूट, रुंदी १६ फूट व वजन २३ टन आहे. 
- जग प्रदक्षिणा करणारी ही पहिलीच लष्करी टीम असेल. तिला पाऊस, वादळ, उष्मा व थंडीसह सागरी चाच्यांचाही सामना करावा लागू शकतो.

सज्जता : ३ वर्षांत २० हजार मैलांचा सागरी प्रवास
ही टीम २०१४ पासून या मोहिमेचे प्रशिक्षण घेत होती. दरम्यान, महादेई व तारिणी नौकांनी २० हजार सागरी मैल अंतर कापले. तारिणीने ८ हजार मैलांचा प्रवास केला. ते मॉरिशसला दाेनदा जाऊन आले.

वर्तिका यांचा विस्मयकारक प्रवास, २० रात्री अंधारात काढल्या
- टीमचे नेतृत्व ले. कमांडर वर्तिका जोशी करत आहेत. ले. कमांडर प्रतिभा जामवाल, पी. स्वाती व ले. एस. विजया, बी. ऐश्वर्या, पायल या सदस्या आहेत. 
- विशाखापट्टणम ते गाेवा हे ३ हजार किमी अंतर टीमने २१ दिवसांत कापलेले आहे. 
- वर्तिकांना ब्राझील ते द. आफ्रिका या सागरी प्रवासाचा अनुभव आहे. जहाजावरील विद्युत उपकरणे बिघडल्याने त्यांनी २० रात्री अंधारात काढल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...