आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सर्जिकल'मध्ये नेतृत्वाचे श्रेय नाकारता येत नाही; मनोहर पर्रीकर यांची स्पष्टोक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी- सर्जिकल स्ट्राइकची कारवाई सशस्त्र दलाने केली होती व त्याचे पूर्ण श्रेय सशस्त्र दलांना द्यावयास हवे. मात्र, ज्यांनी एवढा प्रामाणिक निर्णय घेतला त्या वरिष्ठ राजकीय नेतृत्वास श्रेय देण्यास तुम्ही नकार देऊ शकत नाहीत, असे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. २९ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकवेळी पर्रीकर संरक्षणमंत्री होते. 


पर्रीकर एका वृत्त वाहिनीला म्हणाले, ही एक खूप मोठी मोहीम होती. ती विस्तृत योजना व तयारीनंतर करण्यात आली होती. पंतप्रधानांचे नेतृत्व खूप महत्त्वाचे होते यामुळे ते होऊ शकले, असे मला वाटते. पंतप्रधान पहिल्या दिवसापासून या निर्णयाचे समर्थक राहिले होते. निर्णय घेताना माझ्याजवळ पंतप्रधानांचा पाठिंबा होता. मात्र, यापेक्षा मोहीम लांबली तर... मर्यादित मोहिमेच्या बाहेर गेल्यास आणि प्रत्युत्तरादाखल कारवाई झाल्यास काय होईल? आम्ही कोणत्याही घटनेसाठी स्वत:ला सज्ज केले होते. आमची योजना केवळ छोट्या मोहिमेबाबत सांगत नव्हती, तर काही चुकीचे झाल्यास मोहिमेच्या पूर्ण अपयशाबाबत माहितीही देते. हा आमच्यासाठी महत्त्वाचा भाग होता. मोहिमेवर टीका व सत्यतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसने माफी मागितली पाहिजे. मला वाटते त्यांना आपल्या चुकीची जाणीव असावी. 

बातम्या आणखी आहेत...