अकोल्याचे 5 युवक गोव्यात समुद्रात बुडाले; 3 मृतदेह सापडले, २ बेपत्ता
गोव्यातील कळंगुट बीचवर अकोला येथील तीन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. अकोला येथील 14 जण गोवा येथे पर्यटनासाठी आले होते.
-
प्रितेश, चेतन आणि किरणअकाेला - अकाेल्यातील उमरी परिसरातील ५ पाच युवक गाेवा येथील समुद्रात बुडाल्याची घटना साेमवारी सकाळी घडली. यापैकी ३ युवकांचे मृतदेह सापडले असून रात्री उशिरापर्यंत दाेघांचा शाेध सुरू हाेता. मृतांत दाेन सख्ख्या भावांचा समावेश अाहे.
उमरी परिसरातील तरुणांचा समूह गाेव्यातील कळंगुट समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेला होता. ते सर्व समुद्रात पोहण्याचा आनंद घेत होते. मात्र, खवळलेल्या समुद्राने त्यांच्यापैकी पाच जणांना आत ओढले. काही क्षणातच ते बेपत्ता झाले. उर्वरित किनाऱ्यावर हाेते. काही वेळानंतर शाेध कार्याला प्रारंभ झाला. त्यातील तिघांचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरू आहे. त्यात एक पोलिस कर्मचारीही आहे.
अशी अाहेत मृतांची नावे
समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये दोघे सख्खे भाऊ आहेत. प्रितेश लंकेश्वर नंदागवळी (३२) चेतन नंदागवळी (२७), उज्ज्वल ऊर्फ डॅम वाकाेडे (२५) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही जण उमरीतील विठ्ठल मंदिर परिसरातील रहिवासी अाहेत. प्रितेश दर्यापूर तालुक्यात पोलिस हाेता. किरण म्हस्के आणि शुभम वैद्य हे दोघे बेपत्ता असून, त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.जिल्हा प्रशासन गाेेवा प्रशासनाच्या संपर्कात
बेपत्ता युवकांचे शोध कार्य तटरक्षक दलामार्फत सुरू आहे. अकोला जिल्हा प्रशासन उपविभागीय दंडाधिकारी म्हापसा (गोवा) व कळंगुट पोलिस ठाण्याच्या संपर्कात आहे. बेपत्ता युवकांचा शोध लागल्यास प्रशासनाद्वारे संबंधितांना कळवण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली अाहे. -
मृत प्रीतेश नंदगवळी (३२ वर्ष)
-
बेपत्ता किरण म्हस्के
-
मृत चेतन नंदगवळी(२७ वर्ष)
-
प्रितेश उज्वल आणि शुभम