आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा आकाश जानेवारीत; विद्यार्थ्यांसाठी सबसिडी, 330 कोटींची योजना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ‘आकाश-4’ टॅब्लेटच्या भव्य योजनेला मंजुरी दिली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठवून स्वस्त टॅब्लेटच्या निर्मितीसाठी परवानगी मागितली जाईल. सूत्रांनुसार अशा 22 लाख टॅब्लेटच्या उत्पादनासाठी 330 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पहिल्या टप्प्यात इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये हे टॅब्लेट देण्यात येतील. थेट विक्रेत्यांकडून विकत घेऊन विद्यार्थ्यांना अनुदानित किमतीत ते दिले जातील. यापूर्वी अशाच टॅब्लेटचे उत्पादन मंत्रालयाने परस्पर आयआयटी, जोधपूरकडे सोपवल्यानंतर ‘कॅग’ने तीव्र आक्षेप नोंदवले होते.


टॅब्लेटमध्ये नवे काय?
आकाश-4 मध्ये हिंदी, कानडी, पंजाबी, गुजराती, तामिळ, मल्याळम आणि मणिपूर या भाषांचा वापर करता येणार आहे. शिवाय, ऑडिओ-व्हिडिओ चॅटिंगची सुविधाही यात असेल.