आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निवडणूक: 923 पैकी 78 उमेदवारांवर खूनाचा गुन्‍हा, 198 उमेदवार कोट्याधीश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर- गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्‍या टप्‍प्‍यात निवडणूक लढवणा-या 923 उमेदवारांपैकी 137 (15%) उमेदवारांवर फौजदारी गुन्‍हे दाखल आहेत. 198 उमेदवार कोट्याधीश आहेत.  78 (8%) उमेदवार असे आहेत ज्‍यांच्‍यावर खून, बलात्‍कार, अपहरण यांसारखे गंभीर गुन्‍हे दाखल आहेत. भाजपचे डेडियापाडा या विधानसभा क्षेत्राचे उमेदवार महेश छोटू वसावा यांच्‍याविरोधात खूनाचा गुन्‍हा दाखल आहे. याशिवाय 8 उमेदवारांवर खून करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍याचा गुन्‍हा दाखल आहे. 2 उमेदवारांवर बलात्‍काराचा तर 3 जणांवर अपहरणाचा गुन्‍हा दाखल आहे. 

 

उमेदवारांवरील फौजदारी गुन्‍हे 
- 21 जागांवरील 3 पेक्षा जास्‍त उमेदवारांवर फौजदारी गुन्‍हा. 
- जामनगर उत्‍तरमध्‍ये 24 उमेदवारांपैकी 7 जणांविरोधात फौजदारी गुन्‍हा. 
- वांकानेरमध्‍ये 5 आणि भावनगरमध्‍ये 4 उमेदवारांवर गुन्‍हे दाखल आहेत. 


सरासरी संपत्‍ती 2.16 कोटी 
- पहिल्‍या टप्‍प्‍यातील उमेदवारांची सरासरी संपत्‍ती 2.16 कोटी रुपये आहे. 
- भाजपच्‍या 89 उमेदवारांची सरासरी संपत्‍ती 10.70 कोटी रुपये आहे. 
- काँग्रेसच्‍या 86 उमेदवारांची सरासरी संपत्‍ती 8.46 कोटी रुपये आहे. 


उमेदवारांची संपत्‍ती 
- 65 उमेदवारांची (7%) संपत्‍ती 5 कोटी रुपयाहून जास्‍त. 
- 60 उमेदवारांची (7%) संपत्‍ती 2 ते 5 कोटी दरम्‍यान. 
- 161 उमेदवारांची (17%) संपत्‍ती 50 लाख ते 2 कोटी दरम्‍यान. 
- 219 उमेदवारांची (24%) संपत्‍ती 10 ते 50 लाख दरम्‍यान. 
- 418 उमेदवारांची (45%) संपत्‍ती 10 लाखापेक्षा कमी. 
- शुन्‍य संपत्‍ती असणारेदेखील 2 उमेदवार आहे. 


एक दृष्‍टीक्षेप 
भाजप-
89 पैकी 22 (25%) उमेदवारांविरोधात 10 गंभीर गुन्‍ह्यांचे केस. 
काँग्रेस- 86 पैकी 31 (36%) जणांवर 20 प्रकारचे गंभीर गुन्‍हे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, गुजरात निवडणूक: 2 टप्‍प्‍यात मतदान...

बातम्या आणखी आहेत...