आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्याच्या बिचवर आढळला मगरीचा मृतदेह, आणखी एक मगर दिसली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- गेल्या काही दिवसांपूर्वी गोव्याच्या मोरजिम बिचवर मगर आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता मिरामार बिचवर एका मगरीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे गोव्याच्या बिचेसवर अनेक मगरी असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
यासंदर्भात वनविभागाचे उपसंरक्षक डीएनएफ कारव्हालो यांनी सांगितले, की मिरामार बिचवर एका मगरीचा मृतदेह सापडला आहे. तो पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यावर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. याशिवाय इतरही रहस्यांवरुन पडदा उठण्याची शक्यता आहे.
स्थानिक नागरिकांनी मिरामार बिचवर मगरीचा मृतदेह असल्याची माहिती वन विभागाला दिली होती.
पणजीजवळ असलेला मिरामार बिच हा शहरातील प्रमुख बिच आहे. या बिचवर पर्यटकांची कायम वर्दळ असते.
17 जुलै रोजी मोरजिम बिचवर एक मगर दिसली होती. एका स्थानिक नागरिकाने या मगरीचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकले होते. येथून जवळ असलेल्या चापोरा नदीतून ही मगर आली असावी, असा अंदाज तेव्हा वन विभागाने व्यक्त केला होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, मोरजिम बिचवर आढळून आलेल्या मगरीचे फोटो....