आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defence Minister Manohar Parrikar Hits Retirement

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निवृत्तीचे संकेत, म्हणाले- गोवा सरकारवर ठेवणार लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी (गोवा)- संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजकारणातून निवृत्ती स्विकारणार असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यांच्या या भूमिकेने केंद्रीय राजकारणात खळबळ माजण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची निवड करुन संरक्षणमंत्री हे मोठे पद दिले होते. मात्र, गोव्यात विश्वासार्ह राजकीय नेतृत्वाची कमतरता असल्याचे सांगून पर्रिकर यांनी एका मोठ्या चर्चेला तोंड फोडले आहे. दरम्यान, पर्रिकर यांनी आता आपले वक्तव्य मागे घेतले आहे. मी सहज असे म्हणालो होतो. त्याचा गांभीर्याने अर्थ घेऊ नका, असा बचाव त्यांनी केला आहे.
म्हापसा येथील लोकमान्य मल्टिपरपस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना पर्रिकर म्हणाले, की साठी गाठल्यावर प्रत्येकाने निवृत्त होण्याचा विचार करायला हवा. 13 डिसेंबर रोजी मी 60 वर्षांचा होणार आहे. दोन-तीन वर्षांपासून मी निवृत्तीचा विचार करतोय. आता मला मोठी जबाबदारी घेण्याची इच्छा नाही.
पर्रिकर म्हणाले, की राजकारणातून निवृत्त होण्याचा मी जरी विचार करतोय तरी गोवा सरकारवर माझे लक्ष राहणार आहे. गोव्या सारख्या लहान राज्यांमध्ये योग्य नेतृत्वाची कमतरता दिसून येते. गोव्यातही अशी परिस्थिती आहे. मी जरी निवृत्त झालो तरी गोवा सरकारवर माझे लक्ष राहणार आहे. काही चुकिचे निर्णय घेतले तर गोवा सरकारला योग्य मार्गावर आणण्यासाठी मी कटिबद्ध असेन.
2012 पासून मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री होते. 2014 मध्ये त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारमध्ये संरक्षण मंत्र्याचा पदभार स्विकारला.