Home »National »Delhi» Election Commission Announce Gujarat And Himachal Pradesh Poll Dates Today

हिमाचलमध्ये 9 नोव्हेंबरला मतदान, 18 डिसेंबरला निकाल; गुजरात निवडणूक कार्यक्रम लवकरच

हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये तर गुजरात विधानसभेचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये पूर्ण होत आहे.

दिव्य मराठी वेब टीम | Oct 12, 2017, 17:45 PM IST

नवी दिल्ली - हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली. 9 नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्याचे मतदान होईल आणि 18 डिसेंबर रोजी निकाल जाहिर होतील. हिमाचलमध्ये 68 जागांसाठी मतदान होणार असून सर्व मतदान केंद्रावर VVPAT अर्थात व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल मशिनचा वापर होणार आहे. आयोगाने गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. गुजरात विधानसभा निवडणुकीचीही आज घोषणा होण्याची शक्यता होती मात्र आयोगाने अद्याप या तारखा जाहीर केलेल्या नाही. त्यांची घोषणा लवकरच होणार आहे. आयोगाने म्हटले आहे, की हिमाचलच्या निकालाचा परिणाम गुजरात निवडणुकीवर व्हावा अशी आमची इच्छा नाही. हिमाचलमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे तर गुजरातमध्ये भाजप सत्तेत आहे.
हिमाचलमध्ये आदर्श आचारसंहिता आजपासून लागू
- हिमाचल प्रदेशात आजपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. येथे 7521 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
- सर्व पोलिस बुधवर VVPAT मशिनचा वापर होणार आहे.
- त्यासोबतच सर्व मतदान केंद्रावर व्हिडिओ शुटिंग होईल.
- विधानसभेच्या प्रत्येक उमेदवाराला 28 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा राहाणार आहे.
- विधानसभा निवडणुकीमध्ये फोटो व्होटर आयडीचा वापर होईल.

वीरभद्र सिंह मुख्यमंत्री पदाचे उमेदवार
हिमाचल प्रदेशात सध्या काँग्रेसचे वीरभद्र सिंह मुख्यमंत्री आहेत. हिमाचलमध्ये सर्वाधिककाळ मुख्यमंत्री राहाणारे ते नेते आहेत. वीरभद्र सिंह हे 5 वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग केसही सुरु आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.
वीरभद्र सिंह 4 वेळा मुख्यमंत्री
- 1983-1990
- 1993-1998
- 2003-2007
- 2012-2017
प्रेमकुमार धूमल
- हिमाचल प्रदेशातील हे भाजपचे नेते आहेत. धूमल दोनवेळा मुख्यमंत्री होते. आता ते विरोधीपक्ष नेते आहे. त्यांचे चिरंजीव अनुराग ठाकूर भाजपचे खासदार आहेत. भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. मात्र धूमल या स्पर्धेत सर्वात पुढे आहेत.
केव्हा-केव्हा होते मुख्यमंत्री
- 1998-2003
- 2008-2012
जेपी नड्डा
- बिलासपूर रॅलीमध्ये नरेंद्र मोदींनी जे.पी. नड्डा यांचे कौतूक करुन हिमाचल विधानसभा निवडणुकीत त्यांचे महत्त्व वाढवले आहे. मात्र भाजपने अद्याप येथे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. धूमल यांच्यानंतर पक्षात नड्डा हेच मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत. नड्डा सध्या केंद्रात आरोग्य मंत्री आहेत. ते हिमाचलमध्येही आरोग्य मंत्री राहिले आहेत.
हिमाचल प्रदेशच्या मागील विधानसभा निवडणुकीवर एक नजर
पार्टी 2012 विधानसभा निवडणूक वोट शेयर 2014 लोकसभा निवडणूक
काँग्रेस 36 42.8% 04
भाजप 26 38.5% 00
एचएलपी 1 1.9% 00
अपक्ष 5 12.1% 00
* विधानसभेच्या 68 जागा, लोकसभेच्या 4 जागा आहे.
गुजरात विधानसभेवर एक नजर
पक्ष 2012 विधानसभा निवडणूक वोट शेयर 2014 लोकसभा निवडणूक
भाजप 115 47.9% 26
काँग्रेस 61 38.9% 00
जीपीपी 2 3.6% 00
एनसीपी 2 3.6% 00
जेडीयू 1 5.8% 00
अपक्ष 1 2.9% 00
* विधानसभेच्या 182 जागा, लोकसभेच्या 26 जागा आहे.
दोन्ही राज्यांमध्ये यांची राहाणार महत्त्वाची भूमिका
गुजरात:
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, अमित शहा, विजय रूपाणी, हार्दिक पटेल, अरविंद केजरीवाल
हिमाचल प्रदेश: नरेंद्र मोदी, अमित शाह, राहुल गांधी, वीरभद्र सिंह, जेपी नड्डा

Next Article

Recommended