आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Goa Chief Minister Sudina Dhavalikara MGP Parsekar Of The Shot, Quit, And Then Comment

गोव्याचे मुख्यमंत्री पारसेकर यांचा मगोपचे मंत्री सुदिन धवळीकर यांना टोला, राजीनामा द्या, नंतर टीका करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी : जे असमाधानी आहेत ते राजीनामा देण्यास मोकळे आहेत, त्यांनी आधी राजीनामा द्यावा आणि नंतरच सरकारविरुद्ध बोलावे, असा टोला गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी सोमवारी मगोपचे नेते आणि राज्याचे वाहतूकमंत्री सुदीन धवळीकर यांना मारला. धवळीकर यांनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्र्यांनीही जोरदार शब्दांत उत्तर दिल्याने सत्ताधारी भाजप-मगोप युतीतील वाद वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री पारसेकर यांनी अडीच वर्षांच्या कारकीर्दीत राज्याला १० वर्षे मागे नेले आहे. पारसेकर यांच्याकडे नेतेपद कायम राहिले तर आपला पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपशी युती करणार नाही, असे वक्तव्य धवळीकर यांनी केले होते. धवळीकर यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना पारसेकर म्हणाले की, माझ्यासाठी अजेंडा ठरवण्याचा कुठलाही अधिकार सुदीन धवळीकर यांना नाही. राज्य सरकारमध्ये त्यांना गुदमरल्यासारखे वाटत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन बाहेर पडावे आणि त्यानंतरच आमच्याविरोधात जाहीर वक्तव्य करावे.

मगोप हा युतीतील घटक पक्षांशी एकनिष्ठ नाही, असा आरोप करून पारसेकर म्हणाले की, मगोपला फक्त सत्तेची हाव आहे. २०१२ च्या निवडणुकीपूर्वी हा पक्ष काँग्रेससोबत होता. सध्याचे सरकार माझे आहे. जर कोणी सरकारबद्दल समाधानी नसेल किंवा आमची कामगिरी चांगली नसेल तर ते राजीनामा देण्यास मोकळे आहेत. मी राज्याला दहा वर्षे किंवा २० वर्षे मागे नेले हे गोव्याचे लोकच ठरवतील.
धवळीकर यांना अलीकडे काही घटकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यासाठी उद्युक्त केले असावे, असा संशय धवळीकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, गेल्या दोन-तीन दिवसांतच धवळीकर यांना काय झाले आहे? ज्यांनी उद्युक्त केले त्यांची भेट धवळीकर यांनी घेतली की त्यांना आता मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पडण्यास सुरुवात झाली आहे, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विचारला. तुम्ही धवळीकर यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ का करत नाही, या प्रश्नावर, मी सत्तेचा गैरवापर करणार नाही, असे उत्तर पारसेकर यांनी दिले.
बातम्या आणखी आहेत...