आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govekar Chinge His Nationality And Made Portuguese

दररोज सहा गोवेकर बनताहेत पोर्तुगीज!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - भारतात राहून धडाधड राष्ट्रीयत्व बदलण्याचा फंडा गोव्यात बिनबोभाटपणे सुरू असल्याचे उघड झाले आहे. गेल्या पाच वर्षांत दररोज सरासरी सहा नागरिक पोर्तुगीज बनतात. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे. राजधानीत पोर्तुगीज राजदूत कार्यालय आहे. 2008 पासून राष्ट्रीयत्व बदलण्याचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 2 हजार 700 मतदारांचे राष्ट्रीयत्व बदलल्याने त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. अजूनही 8 हजार 800 अर्जांचा आढावा घेण्यात येत आहे. 31 जानेवारी 2008 ते 31 जानेवारी 2013 दरम्यान 11 हजारांहून अधिक नागरिकांकडे पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य निवडणूक विभागाने प्रदेशातील मतदारांचा आढावा घेण्याचे काम हाती घेतले आहे. त्यात 24 हजार नवीन मतदारांची भर पडली आहे. पुढील महिन्यात अंतिम यादी जाहीर करण्यात होणार आहे.
नेमके प्रकरण काय : गोव्यातील पोर्तुगीज नागरी वस्तींना 1961 मध्ये वसाहतींच्या नियमातून मुक्तता झाली. मात्र, पूर्वीच्या सत्ताधाºयांनी यातील काही नियमांत सूट दिली. त्यानुसार ज्यांना पोर्तुगालचे नागरिकत्व हवे असेल त्यांना काही सवलती देण्यात आल्या आहेत.