आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hunger Strike In Sun Will Make You \'dark\', \'ruin Marital Prospects\', Goa CM Allegedly Tells Nurses

मुलींनो, उन्हात उपोषण करू नका, काळ्या पडाल, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा नर्सना सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी राज्यात आंदोलन करत असलेल्या नर्सना "भरउन्हात बेमुदत उपोषण करू नका,' असा सल्ला दिला आहे. उन्हात आंदोलन केल्याने तुम्ही काळ्या पडाल, तुमचा विवाह व्हायचा नाही, असे मुख्यमंत्री पारसेकर यांनी म्हटल्याचा आरोप आंदोलक नर्सेसनी केला आहे.
विविध मागण्यांसदंर्भात नर्सेस मंगळवारी मुख्यमंत्री पारसेकर यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. त्या वेळी त्यांनी वरील सल्ला दिल्याचा नर्सेसचा आरोप आहे. नर्स अनुषा सावंत यांनी सांगितले की, आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आमच्या मागण्यांवर मार्ग काढण्याच्या मागणीसाठी गेलो होतो. त्या वेळी ते म्हणाले की, मुलींनी उन्हामध्ये बेमुदत उपोषण करू नये. त्यामुळे त्या काळ्या होतील. त्यांना चांगला नवरा मिळणार नाही. दरम्यान पारसेकर यांनी बुधवारी या वक्तव्याचे खंडन केले. मी अनुषाला आधीपासून ओळखतो. सहज म्हणून बोललो. पण विवाहाची गोष्ट अजिबात केली नाही.

मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी आम्हाला अशा प्रकारच्या विधानाची कल्पना नाही, परंतु ते अशा प्रकारचे वक्तव्य करतील असे आम्हाला वाटत नाही, असे म्हटले आहे.