आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रपटांमुळे मिळते छेडछाडीला प्रोत्साहन, महिलांची चांगली इमेज दाखवावी : मनेका गांधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनेका म्हणाल्या, चित्रपट हिंदी असो की प्रादेशिक, सर्वात प्रेमाची सुरुवात छेडछाडीतूनच होते. (फाइल) - Divya Marathi
मनेका म्हणाल्या, चित्रपट हिंदी असो की प्रादेशिक, सर्वात प्रेमाची सुरुवात छेडछाडीतूनच होते. (फाइल)
पणजी - युनियन मिनिस्टर मनेका गांधी यांनी महिलांची छेडछाड आणि त्यांच्या विरोधात होणाऱ्या गुन्ह्यांसाठी चित्रपटांना जबाबदार ठरवले आहे. तसेच महिलांची चांगली प्रतिमा दाखवावी अशी विनंतीही फिल्म इंडस्ट्रीला केली आहे. मनेका गांधी म्हणाल्या की, जवळपास प्रत्येक चित्रपटात छेडछाडीला प्रोत्साहन दिले जाते. त्या म्हणाल्या, हिंदी असो वा प्रादेशिक, सर्व चित्रपटांत प्रेमाची सुरुवात छेडछाडीतूनच होत असते. तरुण आणि त्याचे मित्र तरुणीच्या मागे फिरत असतात आणि येता जाता तिला त्रास देत असतात. त्यानंतर अखेर तरुणी त्याच्या प्रेमात पडते. 

गोवा फेस्टमध्ये बोलत होत्या मनेका.. 
- न्यूज एजन्सीच्या मते मनेका गांधी म्हणाल्या की, पुरुष महिलांच्या विरोधात हिंसाचारात सहभागी का असतात याचे ठोस कारण आपल्याकडे आहे. ते म्हणजे चित्रपट. तुम्ही तर चित्रपट पाहिले तर प्रत्येक चित्रपटात रोमान्सची सुरुवात छेडछाडीतून होत असते. 
- तरुण तरुणीचा पाठलाग करतो, तरुणी नकार देतो, तरुण पाठलाग करणे सुरू ठेवतो आणि अखेर तरुणी होकार देते. भारतीय चित्रपटांत रोमान्स असाच असतो. 
- गोवा फेस्टमध्ये शुक्रवारी मनेका यांनी चित्रपट तयार करणाऱ्यांना महिलांची चांगली इमेज दाखवण्याची विनंती केली आहे. 

मनेकांनी सांगितली इतरही कारणे 
- वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट मिनिस्टर मनेका म्हणाल्या, चित्रपट हे गेल्या 50 वर्षांपासून संवादाचे महत्त्वाचे माध्यम राहिलेले आहे. पण आपण त्यात महिलांची प्रतिमा कशी दाखवत आहोत. 
- ते म्हणाले, शक्तीहीन पुरुषही महिलांबरोबर हिंसा करतात. त्याला शक्तीहीन असल्याची जाणीव झाली तर तो ओरडतो. त्याचप्रमाणे पुरुषांना नोकरी न मिळणे हीदेखिल महिलांच्या विरोधात हिंसेचे कारण असते. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
 
बातम्या आणखी आहेत...