आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इर्मा चक्रीवादळ : परराष्ट्र मंत्रालय भारतीयांच्या संपर्कात, 50 लाख लोक फ्लोरिडा सोडणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुमारे 10 लाख लोक फ्लोरिडातील मियामी आणि इतर शहरातून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. - Divya Marathi
सुमारे 10 लाख लोक फ्लोरिडातील मियामी आणि इतर शहरातून सुरक्षित ठिकाणी जात आहेत.
नवी दिल्ली - कॅरेबियन आयलंडवर धुमाकूळ घातल्यानंतर इर्मा चक्रीवादळ फ्लोरिडाच्या दिशेने पुढे निघाले आहे. या पार्श्वभूमीवर फ्लोरिडामधील 50 लाख नागरिकांना शहर सोडण्यास सांगण्यात आले आहे. क्यूबा आणि बाहामास येथे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या वादळात 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालय (MEA) इर्मा प्रभावित अनिवासी भारतीयांच्या सतत संपर्कात आहे. मंत्रालयाने म्हटले आहे, की आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून असून विदेशातील भारतीयांशी सातत्याने संपर्क ठेवून आहोत. MEA ने भारतीयांसाठी हेल्पलाइन नंबर सुरु केला आहे. 
 
हा आहे हेल्पलाइन नंबर 
- MEA ने ट्विट करुन हेल्पलाइन नंबर प्रसिद्ध केला आहे. यात भारतीयांना आवाहन करण्यात आले आहे की आपातकालिन स्थिती उत्पन्न झाल्यास तत्काळ भारतीय दुतावासाशी संपर्क करा. 
- व्हेनेझुएला -  +58 4241951854/4142214721
- नेदरलँड - +31247247247
- फ्रान्स - 0800000971
 
काय उपाययोजना केल्या? 
- ट्विटमध्ये म्हटले आहे, \'व्हेनेझुएला, नेदरलँड, फ्रान्स आणि अमेरिकेतील परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत. इरमा पीडित भागातील भारतीयांशी संपर्कात असून त्यांना शक्य ती मदत केली जाईल. अधिकाऱ्यांशी बातचीत सुरु आहे.\'
- नेदरलँडमधील भारतीय दुतावासाने ट्विट केले आहे, की ते सातत्याने डच सरकारच्या संपर्कात आहेत. कारकास (व्हेनेझुएला) येथे राहाणाऱ्या भारतीयांची मदत करण्यासाठी शक्यते पाऊले उचलले जात आहे. 
 
फ्लोरिडा सोडण्याचे भारतीयांना निर्देश 
- इरमा चक्रीवादळाने फ्लोरिडाला वेढा टाकला आहे. यामुळे 50 लाख नागरिकांना शहर सोडण्यास सांगण्यात आला आहे. यात हजारो इंडो-अमेरिकन देखील आहेत. ही संख्या फ्लोरिडाच्या एकूण लोकसंख्येच्या एक चतुर्थांश आहे.   
 
आणीबाणी जाहीर, मदतनिधी जारी 
- फ्लोरिडामध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. मदत कार्यासाठी ट्रम्प गव्हर्नमेंटने 15.26 बिलियन डॉलर अर्थात 96 हजार कोटींपेक्षा जास्त अतिरिक्त निधी देण्याचे निर्देश दिले आहे. 
- व्हाइट हाऊस प्रेस सेक्रेटरी साराह सँडर्स म्हणाल्या, \'आमच्या साऊथ इस्ट आणि कॅरेबियन भागात नागरिक पाय रोवून उभे आहेत. अमेरिकन सरकार राजकारणाच्या पलिकडे त्यांच्या मदतीला प्राधान्य देते.\' 
बातम्या आणखी आहेत...