Home | National | Goa | News About Ex-Goa CM Digambar Kamat

गोवा: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची अटक गरजेची; ‘एसआयटी’चे न्यायालयात प्रतिज्ञापत्र

प्रतिनिधी | Update - May 12, 2017, 11:03 PM IST

गोव्याचे माजी खाणमंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची बेकायदा खाण घोटाळा प्रकरणी पोलिस कोठडीतील जबानी महत्वाची आहे आणि त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असे प्रतिज्ञापत्र या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या एसआयटीने शुक्रवारी जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल केले.

 • News About Ex-Goa CM Digambar Kamat
  गोवा- गोव्याचे माजी खाणमंत्री तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची बेकायदा खाण घोटाळा प्रकरणी पोलिस कोठडीतील जबानी महत्वाची आहे आणि त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, असे प्रतिज्ञापत्र या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या एसआयटीने शुक्रवारी जिल्हा आणि सत्र न्यायालयात दाखल केले.
  गोव्यातील ३५ हजार कोटी रूपयांच्या बेकायदा खाण घोटाळ्याची चौकशी ‘एसआयटी’ तर्फे केली जात आहे. ‘एसआयटी’ कडून अटकेची शक्यता असल्याने दिगंबर कामत यांनी जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या जामीनावरील सुनावणीवेळी ‘एसआयटी’ कडून हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. दिगंबर कामत यांनी खाणमंत्री या नात्याने या सर्व गैरव्यवहारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. खाण खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांनी खाण घोटाळ्याला मुक समंती दिली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.
  ‘एसआयटी’ कडून दाखल केलेले प्रतिज्ञापत्र मोठे असल्याने त्याला प्रत्यूत्तर देण्यासाठी अतिरीक्त वेळ हवा, अशी विनंती कामत यांच्या वकिलांकडून केली असता पुढील सुनावणी २९ मे रोजी ठेवण्यात आली आहे.
  खनिज उत्खनन मर्यादांचे उल्लंघन करून २००९-१० या वर्षी ९२५२ मेट्रीक टन आणि २०१०-११ या वर्षी ३३९९५ मेट्रीक टन अतिरीक्त खनिज उत्खनन केले गेले आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी झालीच पण त्याचबरोबर सरकारच्या तिजोरीला मोठा फटका बसला, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. ‘कंडोनेशन आॅफ डिले’ आणि नियमबाह्य खाण परवान्यांचे नुतनीकरण दिगंबर कामत यांच्या समंतीनेच झाले, असेही ‘एसआयटी’ ने म्हटले आहे.

  दिगंबर कामत हे सराईत अपराधी आहेत. ते पुरावे नष्ट करून साक्षीदारांना प्रभावीत करू शकतात आणि त्यामुळे त्यांची अटक गरजेची आहे, असे एसआयटीने न्यायालयाला कळवले आहे.

Trending