Home | National | Goa | news about Former Goa Chief Minister Digambar Kamat

गोवा: माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या अडचणीत वाढ

प्रतिनिधी | Update - May 04, 2017, 10:25 PM IST

गोव्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी खाणमंत्री तथा मुख्यमंत्री असताना आपल्याकडून खाण व्यवहारांसंबंधी अनेक गोष्टी करून घेतल्या आहे.

  • news about Former Goa Chief Minister Digambar Kamat
    गोवा- गोव्याचे ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी खाणमंत्री तथा मुख्यमंत्री असताना आपल्याकडून खाण व्यवहारांसंबंधी अनेक गोष्टी करून घेतल्या आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमुर्ती एम. बी. शहा आयोगाने आपल्या अहवालात विशेष नोंद केलेल्या कंडोनेशन डिले प्रकरणात कामत यांच्या सांगण्यावरूनच आपण फाईल्स निकाली काढल्या, असा जबाब माजी खाण संचालक जे. बी. भिंगी यांनी बुधवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर दिला आहे.
    यासंबंधीचे गोव्यातील एका स्थानिक दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताने सर्वंत्र खळबळ उडाली आहे. जे. बी. भिंगी यांच्या या जबाबामुळे दिगंबर कामत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. गोव्यातील ३५ हजार कोटी रूपयांच्या बेकायदा खाण घोटाळा प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (एसआयटी) करीत आहे. या पथकाकडून दिगंबर कामत यांना चौकशीसाठी पाचारण केले असता दिगंबर कामत यांनी अटकपूर्व जामीनासाठी भ्रष्टाचार विरोधी न्यायालयात अर्ज दाखल केला असता कामत यांना तूर्त दिलासा मिळाला आहे.

    अटकपूर्व जामीनावरील निकालापूर्वी कामत यांना अटक केली जाऊ नये,असे न्यायालयाने फर्मावल्याने त्यांना सरंक्षण मिळाले आहे. दरम्यान, एसआयटी ने कामत यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीवेळी आपली बाजू अद्याप मांडलेली नाही. आता जे. बी. भिंगी यांनी दिलेल्या जबाबाचा आधार घेऊन ‘एसआयटी’ न्यायालयासमोर भक्कम पुरावा सादर करून या अटकपूर्व जामीनाला विरोध करण्याची शक्यता असल्याने कामत यांच्यासमोर अटकेचा धोका अधिक बळावण्याची शक्यता आहे.
    माजी खाण संचालक जे.बी.भिंगी यांनी आपल्या जबानीत इतरही अनेक महत्वाची माहिती न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर खुली केल्याची खबर आहे. या खबरीवरून आता या खाण घोटाळ्याच्या चौकशीला वेगळी गती प्राप्त होईल, असा विश्वास एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. काही खाण कंपन्या तथा अधिकाऱ्यांची नावे भिंगी यांनी या जबानीत उघड केल्याचीही खबर आहे.

Trending