Home | National | Goa | news about manohar parrikar

पणजीतून सहाव्यांदा निवडून येईन; मनोहर पर्रीकरांना प्रचंड विश्वास

प्रतिनिधी | Update - May 11, 2017, 09:40 PM IST

आपल्या विरोधात कोण उमेदवार असेल याची आपल्याला तमा नाही परंतु पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूकीत ३० टक्के मतांची आघाडी घेऊन आपण निवडून येणार, असा प्रचंड विश्वास माजी सरंक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. पणजी मतदारसंघ हीच आपली खरी पसंती होती, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

 • news about manohar parrikar
  गोवा- आपल्या विरोधात कोण उमेदवार असेल याची आपल्याला तमा नाही परंतु पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूकीत ३० टक्के मतांची आघाडी घेऊन आपण निवडून येणार, असा प्रचंड विश्वास माजी सरंक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला. पणजी मतदारसंघ हीच आपली खरी पसंती होती, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पणजी मतदारसंघातून आपण सहाव्यांदा निवडून येईल. भाजप आघाडी सरकारचे काम चांगले सुरु असून हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वासही पर्रीकर यांनी बोलून दाखवला.

  दरम्यान, काँग्रेस पक्षातर्फे माजीमंत्री बाबूश मोन्सेरात यांना काँग्रेसच्यावतीने पणजी मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवण्याचा आग्रह होत आहे. पक्षाचे राष्ट्रीय प्रभारी डॉ. ए. चेल्लाकुमार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. अलिकडेच झालेल्या निवडणूकीत बाबूश मोन्सेरात यांनी काँग्रेसच्या पाठींब्याने अपक्ष म्हणून पणजी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी त्यांचा अवघ्या १ हजार मतांनी पराभव केला होता.
  बाबूश मोन्सेरात यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली होती. तूर्त काँग्रेसला बाबूश सोडून पणजीसाठी एकही प्रबळ उमेदवार नसल्याने बाबूश यांना परत सन्मानाने काँग्रेसमध्ये बोलावून पणजीची उमेदवारी देण्याची आँफर केली आहे. बाबूश यांनी अद्याप आपला निर्णय कळवलेला नाही.
  पणजी मतदारसंघातून आपण सहाव्यांदा निवडून येईल. भाजप आघाडी सरकारचे काम चांगले सुरु असून हे सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वासही पर्रीकर यांनी बोलून दाखवला.
  पुढील स्लाइडवर वाचा, पर्रीकरांचा अश्वमेध रोखणार: गोवा सुरक्षा मंच....

 • news about manohar parrikar
  पर्रीकरांचा अश्वमेध रोखणार: गोवा सुरक्षा मंच
   
  गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत अल्पमतात असूनही राज्यात सत्ता स्थापन केली आहे. अनैतिक पद्धतीने सत्तेवर स्वार झालेल्या पर्रीकरांचा अश्वमेध पोटनिवडणूकीत रोखणार असल्याची गर्जना गोवा सुरक्षा मंच पक्षाने केली आहे. 
  राज्यात इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान देण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी गोवा सुरक्षा मंच पक्षाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी गोवा संघचालक प्रा. सुभाष वेलिंगकर हे या पक्षाचे मार्गदर्शक आहेत. 
  २०१७ च्या विधानसभा निवडणूकीत गोवा सुरक्षा मंचाने मगोसोबत युती करून निवडणूक लढवली होती. या पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही परंतु भाजपविरोधातील आक्रमक प्रचार मात्र विरोधी काँग्रेस तथा इतर प्रादेशिक पक्षांच्या पथ्यावर पडला.
   
   यावेळी चक्क मनोहर पर्रीकरच रिंगणात असल्याने गोवा सुरक्षा मंच आपली रणनिती लवकरच आखणार, असे प्रदेशाध्यक्ष आनंद शिरोडकर म्हणाले. भाजपने गोव्याचे राजकारण प्रदूषित केले आहे. या राजकारणाच्या स्वच्छतेसाठी पणजीतील जनतेने पुढाकार घेऊन एकजुटीने पर्रीकरांचा पराभव करून त्याचे शुद्धीकरण करावे, असे आवाहन आनंद शिरोडकर यांनी केले आहे.             

Trending