आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा कार्निव्हलला शनिवारपासून सुरुवात होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी  - चार दिवस चालणाऱ्या गोवा कार्निव्हलला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. मांडवी नदीच्या किनाऱ्यावर हा उत्सव साजरा होणार आहे. त्यात हजारो तरुण, आबालवृद्धांचा  सहभाग असतो.  
 
 
पर्यटन विभागाच्या वतीने राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांत परेडचे आयोजन केले आहे. यंदा ‘किंग मोमो’ अशी संकल्पना आहे. गोवा कार्निव्हलमध्ये सुमारे ५० हजारांवर पर्यटक सहभागी होतील, असा विश्वास पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. किंग मोमो हे पौराणिक कथेमधील पात्र आहे. 
 
महोत्सवाच्या निमित्ताने किंग मोमो यांची राज्यावर चार दिवस सत्ता चालणार आहे, अशी माहिती संगीतकार रॉक टॉम फर्नांडिस यांनी दिली. पणजीपासून उत्सवाला सुरुवात होईल. चार दिवस राज्यातील महत्त्वाच्या सर्व शहरांत धूम पाहायला मिळणार आहे.  १८ व्या शतकापासून गोवा कार्निव्हलची परंपरा आहे. 
बातम्या आणखी आहेत...