आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युतीत घेवाणच नव्हे, देवाणही असते, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा भाजपला टाेला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - ‘गाेवा विधानसभेची निवडणूक लढविण्याची घाेषणा केल्यानंतर या राज्यात अामच्या पक्षाची ताकद वाढत अाहे. सत्ताप्राप्तीसाठी आम्ही अन्य पक्षांबरोबर युती करीत अाहोत. मात्र युती करताना फक्त ‘घेवाण’च नव्हे तर ‘देवाण’ही करणे आवश्यक असल्याने आम्ही अन्य पक्षांसाठी अाम्हाला फायदेशीर ठरू शकतील अशाही जागा साेडत अाहाेत,’ अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘दिव्य मराठी’शी बाेलताना सांगितले. मुंबईसह राज्यातील १० महापालिका निवडणुकीत जास्त जागा मिळवण्यासाठी मित्रपक्ष भाजप अाग्रही असल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हा टाेला लगावला.  

सत्ताधारी भाजपला राेखण्यासाठी गोव्यात शिवसेनेने महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी, गोवा सुरक्षा मंच आणि गोवा प्रजा पार्टी या तीन पक्षांबरोबर युती केली अाहे. हे चार पक्ष एकूण ४०  पैकी  ३६ जागा लढवणार आहेत. या चारही पक्षांचे संयोजक म्हणून सुभाष वेलिंगकर काम पाहत आहेत. जागा वाटपाबाबत त्यांच्यात चर्चा सुरू असून १० जानेवारी रोजी अंतिम जागावाटप जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी राऊत सध्या गोव्याला आले आहेत.  

राऊत यांनी सांगितले, ‘शिवसेना गोवा निवडणुकीत पाच जागा लढणार आहे. मात्र जागा वाटपाबाबत आमची बोलणी सुरू असून आमची एखादी जागा कमी होऊ शकते वा वाढूही शकते. 
सत्ता मिळवणे हे आमचे सगळ्यांचे ध्येय असल्याने सामोपचाराने जागा वाटप केले जाणार आहे.  पर्नेम  मतदारसंघ (याला पेडणेही म्हणतात) आम्ही ‘मगोप’साठी सोडला. काेकणातील सावंतवाडीच्या जवळ असल्याने या मतदारसंघात खरे तर शिवसेनेला विजय मिळू शकताे, परंतु युतीचा धर्म पाळायचा असल्याने आम्ही ही जागा मित्रपक्षाला सोडली. अंतिम चर्चेनंतर अशाच प्रकारचे निर्णय सर्वानुमते घेतले जातील,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

वास्कोची जागाही शिवसेनेने मगोपला सोडली असून कंकुळ्ळ येथे  शिवसेना उमेदवार उभा करणार आहे. तेथे ‘आप’ने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एल्विस गोम्स यांना रिंगणात उतरवले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी युतीचा निर्णयही दहा जानेवारीपर्यंत होणार आहे. काँग्रेसशी युती न झाल्यास राष्ट्रवादीनेही ३० जागा लढवण्याची तयारी ठेवली आहे.