आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Panji Police Revels High Profile Prostitution Racket

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोवा : सेक्स रॅकेट उघड, दबंग-2, OMG मध्ये काम केलेल्या Actress ला सोडवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - गोवा पोलिसांनी मंगळवारी पणजीमध्ये एका सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या कारवाईत पोलिसांनी एका अभिनेत्रीला एका दलालाच्या तावडीतून सोडवले. पोलिसांनी सोडवलेल्या अभिनेत्रीने दबंग-2 आणि ओह माय गॉड अशा चित्रपयांमध्ये काम केले असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य दलाल असलेल्या एका महिलेलाही अटक केली आहे. 30 वर्षांच्या या महिलेचे नाव आयेशा सईद आहे. ती मुंबईची राहणारी आहे.

आणकी काहींना अटक होणार
पोलिसांमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात केवळ प्राथमिक कारवाई करण्यात आली आहे. आणखी तपासानंतर या प्रकरणी पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सेक्स रॅकेटमधून सोडवण्यात आलेल्या अभिनेत्रीने पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केले आहे की, तिने आर्थिक अडचणीमुले हा मार्ग स्वीकारला होता. पोलिसांनी सांगितले की, त्यांना मुख्य दलाल असलेल्या आयेशाचा मोबाईल क्रमांक एका वेबसाईटद्वारे भेटला होता. आयेशा मुंबईतही सेक्स रॅकेट चालवत होती.

पोलिसांची चाल यशस्वी
मुंबई पोलिसांनी ग्राहक बनून सौदा केला होता. आयेशाने पोलिस अधिकाऱ्याकडे या अभिननेत्रीबरोबर एका रात्रीचे तीन लाख रुपये मागितले होते. त्यापैकी 1.5 लाख रुपये अॅडव्हान्स मागण्यात आला होता. आयेशाने गोव्याच्या एका मोठ्या हॉटेलात या अभिनेत्रीला पाठवण्याचे ठरले होते. पोलिसांनी सोमवारी हा अॅडव्हान्स आयेशापर्यंत पोहोचवण्यात आला होता. पणजी पोलिसांना पूर्ण प्रकरणाची माहिती देत कारवाई करण्यास सांगण्यात आले होते. ही अभिनेत्री मंगळवारी सकाळी हॉटेलच्या खोलीत पोहोचली. त्यानंतर पोलिस आणि एनजीओची एक टीम येथे पोहोचली. छैप्यात ही अभिनेत्री एका ग्राहकाबरोबर आपत्तीकारक अवस्थेमध्ये आढळून आली होती. त्यानंतर पोलिसांनी या अभिनेत्रीची मुख्य दलाल आयेशाच्या तावडीतून सुटका करत तिला अटक केली.