आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rs 6.20 Crore Spent On Foreign Trips For 2 Goa Ministers, 4 MLAs

गोव्यात दोन मंत्री, चार आमदारांच्या परदेश दौऱ्याचा खर्च ६ कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी - गोव्याचे दोन मंत्री आणि चार आमदारांनी गेल्या दोन वर्षांत किमान २० देशांचा दौरा केला आहे. त्यासाठी राज्याच्या तिजोरीतून ६.२० कोटी रुपये खर्च करण्यात आले. गोवा सरकारने विधानसभेत ही माहिती दिली.
पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर आणि उद्योगमंत्री महादेव नाईक यांनी पर्यटनासंबंधी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विविध देशांचा दौरा केल्याचे विधानसभेत सांगण्यात आले. विधानसभा उपाध्यक्ष अनंत शेत, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काबरल व भाजप आमदार गणेश गावकर आणि सुभाष फलदेसाई यांनी सरकारी खर्चावर विदेश दौरा केला. एकूण रकमेपैकी अर्धा खर्च (३.३६ कोटी रु.) एकट्या परुळेकर यांच्या प्रवासावर खर्च करण्यात आला.