आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: पर्यटकांनो सावधान, गोव्याच्या बिचवर दिसली रशियन मगर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- गोव्याच्या एका समुद्र किनाऱ्यावर मगर फिरत असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बिचवर फिरत असलेली मगरच असल्याचे गोव्याच्या वनविभागाने सांगितले आहे. मोरजिम बिचवर ही मगर आढळली. नीलेश बगकर यांनी या मगरीचे फोटो काढले आणि फेसबुकवर पोस्ट केले आहेत. गोव्याचा मोरजिम बिच टर्टल बिच म्हणून प्रसिद्ध आहे. अनेक देशी-विदेशी पर्यटक या बिचवर येतात. या ठिकाणी मगर दिसल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
समुद्रातून नव्हे नदीतून आली मगर
मोरजिम बिचवर दिसलेली मगर समुद्रातून नव्हे तर नदीतून आली असावी, अशी शक्यता वनविभागाने व्यक्त केली आहे. येथून जवळच चोबरा नदी आहे. ती समुद्राला मिळते. मगर बिचवरुन समुद्रात जात होती, असे सांगण्यात आले आहे. तिच्यामागे काही श्वान होते.
मोरजिम बिच पणजीपासून 30 किलोमीटर आहे. अशा प्रकारची मगर रशियात आढळून येते. त्यामुळे तिला लिटिल रशिया म्हटले जाते. ही मगर येथे कशी आली हे अजुनही गुलदस्त्यात आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, गोव्यातील मगरीचे फोटो....