आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tarun Tejpal News In Marathi, Sexual Assaulting Case

अरे बाबा, सगळे काही तिच्या संमतीने झाले... तेजपाल जबानीवर ठाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी (गोवा)- सहकारी महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेले तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल अजूनही त्यांनी यापूर्वी दिलेल्या जबानीवर ठाम आहेत. त्या दिवशी जे काही घडले ते सगळे महिलेच्या संमतीने झाले, असे तेजपाल यांनी सांगितले आहे.
या प्रकरणाचा तपास करीत असलेले गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, की तपास योग्य दिशेने सुरू आहे. तेजपाल यांची सविस्तर चौकशी सुरू आहे. चौकशीला ते सहकार्य करीत आहेत.
पोलिस उपायुक्त सामी तवरेस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक सुनिता सावंत यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेची टीम तेजपाल यांची सखोल चौकशीत करीत आहे. त्या दिवशी झालेला प्रकार दोघांच्या संमतीने झाला. मी कोणतीही बळजबरी केली नाही, यावर तेजपाल ठाम आहेत, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. दरम्यान, तेजपाल यांनी बलात्कार केल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे.
तेजपाल यांची तिसऱ्यांदा वैद्यकीय चाचणी, वाचा पुढील स्लाईडवर