आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण तेजपाल यांची पौरुषत्व चाचणी, लैंगिक शोषण प्रकरणी अनिवार्य असल्याचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी (गोवा)- महिला सहकाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची गोवा पोलिसांनी गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये आज (सोमवार) पौरुषत्व चाचणी घेतली. लैंगिक शोषणाच्या प्रकरणात ही चाचणी अनिवार्य असते, असे पोलिसांनी सांगितले आहे.
गोव्यातील न्यायालयाने काल (रविवार) 50 वर्षीय तेजपाल यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची सुमारे पाच तास चौकशी केली. त्यांना पोलिस कोठडीत फॅन देण्यासंदर्भात न्यायालयात निर्णय घेण्यात येणार आहे.
तेजपाल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप असल्याने त्यांची गोव्याच्या सरकारी रुग्णालयात पौरुषत्व चाचणी घेण्यात आली. चाचणीच्या निकालांबाबत अद्याप काही समजलेले नाही. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ही चाचणी आवश्यक असते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
तरुण तेजपाल यांच्यावर कोणती कलमे लावण्यात आली आहे, वाचा पुढील स्लाईडवर