आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tehelka Row: Tarun Tejpal Taken For Medical Tests

तरुण तेजपाल यांच्या पुन्हा वैद्यकीय चाचण्या, नुकतीच झाली पौरुषत्व चाचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी (गोवा)- तहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांना आज (बुधवार) पुन्हा गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले असून त्यांच्यावर दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या घेतल्या जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात त्यांची पौरुषत्व चाचणी घेण्यात आली होती.
महिला सहकाऱ्याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तरुण तेजपाल यांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची पौरुषत्व चाचणी घेण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली होती. आज त्यांच्यावर दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यात घेतल्या जाणार आहेत.
यासंदर्भात गोवा पोलिसांनी वरिष्ठ अधिकारी म्हणाले, की तरुण तेजपाल यांना आज सकाळी गोवा मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यांच्यावर दुसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
तेजपाल यांची का घेतली पौरुषत्व चाचणी, वाचा पुढील स्लाईडवर