आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोट: नुकसान टाळण्याचे होते प्रयत्न, म्हणून ऑपरेशन लांबले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय लष्कर प्रमुख जनरल दलबिरसिंह सुहाग यांनी पठाणकोट हल्ल्यावर बुधवारी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, 'पठाणकोट ऑपरेशनला वेळ लागला त्याचे कारण समन्वयाचा आभाव नव्हता तर, कमीत कमी नुकसान होईल या उद्देशाने कारवाई केली गेली होती.' या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात दहशतवाद्यांनी हवाई दल तळावर हल्ला केला होता.

काय म्हणाले आर्मी चीफ
- जनरल सुहाग म्हणाले, कमीत कमी नुकसान होईल या उद्देशानेच ऑपरेशनला वेळ लागला.
- पठाणकोट एअरफोर्स स्टेशनमध्ये दहशतवादी घुसल्यानंतर बरेच दिवस ऑपरेशन चालल्यामुळे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. संरक्षण यंत्रणेत समन्वय नसल्याचे बोलले जात होते.
- दहशतवाद्यांना ठार करण्यात एवढा वेळ का लागला, या प्रश्नाच्या उत्तरात सुहाग म्हणाले, एअरबेस हे काही सर्वसामान्य ठिकाण नव्हते. तिथे मोठी हानी होण्याची शक्यता होती. ती टाळण्यासाठी सावधगिरीने ऑपरेशन करण्यात आले.
- 'त्यावेळी तिथे जे अधिकारी होते त्यांनीच निर्णय घेतले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने कामगिरी हाताळली. '
बातम्या आणखी आहेत...