आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेलिंगकरांमुळे गोव्यात भाजपसमाेर अाव्हान, आम अादमी पक्ष, शिवसेना खाते उघडण्याची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी चांगले काम करून राज्यात भाजपचा चांगला जम बसवला होता. परंतु ते दिल्लीत गेल्यानंतर पक्ष अडचणीत अाला असून विधानसभा निवडणुकीत भाजपसमाेर सत्ता राखण्याचे अाव्हान असेल. अाम अादमी पक्षाने जाेर लावला असला व शिवसेनेने भाजपचे बंडखाेर सुभाष वेलिंगकरांच्या मदतीने गोवा काबीज करण्याचे स्वप्न पाहिले तरी त्यांचे फक्त खाते उघडेल, असे चित्र आहे.
  
पणजीत रिक्षावाला, टॅक्सीवाला, गाइड, दुकानदार, विद्यार्थी, हाॅटेल मालक यांच्याशी  चर्चा केली असता सर्व जण पर्रीकरांच्या कारभाराचे काैतुक करताना दिसतात. त्याउलट विद्यमान मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याबाबत मात्र त्यांच्या बाेलण्यात नाराजी जाणवते. मात्र त्यामुळे भाजपला सत्तेवरून पायउतार हाेण्याचा धाेका नसला तरी बहुमतासाठी छाेट्या पक्षांच्या कुबड्या घेण्याची वेळ मात्र येऊ शकते.   वेलिंगकर भाजपचे नुकसान करू शकतात. ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार एल्विस गोम्स हे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले आहेत. परंतु कुंकळ्ळी या स्वत:च्या मतदारसंघात त्यांचे चांगले काम असून तेथे त्यांना मानणारा वर्ग मोठा असल्याने ते नक्की निवडून येतील. मात्र अन्य ठिकाणी ‘आप’च्या हाती फार काही लागणार नसल्याचे चित्र सध्या तरी दिसते. काँग्रेसने स्वबळावर ४० जागा लढवण्याचा निर्णय घेतला असला तरी  गोवा फाॅरवर्ड पक्षाशी युती करण्याबाबत विचार सुरू अाहे.

माेदींसह केंद्रीय मंत्र्यांची प्रचारसभा  
भाजपने ४० पैकी २१ मतदारसंघांत उमेदवार जाहीर केले असून प्रचारात पर्रीकरांसह अनेक केंद्रीय मंत्र्यांची फाैज उतरवण्याची तयारी केली अाहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन सभा होणार असून भाजपचे  अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री  राजनाथ सिंह, व्यंकय्या नायडू, मनोहर पर्रीकर,नितीन गडकरी, महाराष्ट्राचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  प्रचारास येणार अाहेत. 
बातम्या आणखी आहेत...