आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाच्या मिठासाठी' मजुरांची १० किमी पायपीट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटडी - गुजरातमधील हे मजूर खऱ्या अर्थाने देशासाठी मिठाला जागले आहेत. अतिवृष्टीमुळे पाटडी - खाराघोढा दरम्यानचा दोन किलोमीटरचा रेल्वे ट्रॅक उध्वस्त झाला आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी ३ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत मिठाचे एक गोणीदेखील बाहेर जाणे शक्य नव्हते. व्यापारी व मजुरांनी चर्चा केली. खाराघोढापासून १० किलोमीटरपर्यंत जिथवर मालगाडी येणे शक्य होते तेथून ती लोड करण्याचा निर्णय झाला. २०० मजुरांनी दिवसरात्र मेहनत करून ४२ वॅगनची मालगाडी लोड केली. हे मीठ देशाच्या विविध भागांत पाठवले जाईल.