आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Rupee Earning Man Not Poor In Gujarat,food And Supply Department Strange Observation

गुजरातेत रोज 11 रुपये कमावणारा गरीब नाही, अन्न व पुरवठा विभागाचे अजब निष्‍कर्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - राज्याच्या विकासाचे किस्से सांगण्यात न थकणा-या नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये अकरा रुपये रोज कमावणारी ग्रामीण व्यक्तीही श्रीमंत ठरू शकते. त्याच प्रमाणे 17 रुपये रोज कमाई करणारी व्यक्तही गरीब असणार नाही. हे नियोजन आयोगाच्या निकषांपेक्षाही खराब असलेले राज्याचे हे निकष हाती पडताच काँग्रेसने त्याचे भांडवल करण्यास सुरुवात केली असून याआडून त्यांनी मोदींनाच टीकेचे लक्ष्य ठरवले आहे.
गुजरातच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने 16 डिसेंबर 2013 रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की ग्रामीण भागात महिन्याला 324 रुपये कमावणारा तसेच शहरी भागात महिना 501 रुपये कमावणारा व्यक्ती दारिद्र्यरेषेखाली (बीपीएल) येईल. म्हणजे गावात दर दिवशी 10.80 पैसे आणि शहरांत 16.80 पैसे कमावणारी व्यक्तीच गरीब मानली जाईल. पुरवठा विभागाच्या एका अधिका-याच्या म्हणण्यानुसार राज्यात 16 पॉइंटच्या वरील कुटुंबास बीपीएलच्या यादीत समाविष्ट केले जाऊ शकत नाही. राज्यांत 31 लाख कुटुंबेच बीपीएल आहेत. त्यापैकी आठ लाख कुटुंबांना बीपीएल मानण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे.
मोदींचे लक्ष्य नियोजन आयोग
नियोजन आयोगाने गावात 26 रुपये आणि शहरी भागात 32 रुपये कमावणारी व्यक्ती दारिद्र्य रेषेच्यावर असेल असे म्हटले आहे. त्यावर मोदी यांनी नियोजन आयोगावर सातत्याने टीका केली होती. स्वत: मोदींनीही त्यासाठी आयोगावर अनेकदा जाहीरपणे टीका केली होती. कानपूर येथे 20 ऑक्टोबररोजी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी म्हटले होते की, ‘ते म्हणतात की गावात 26 रुपये आणि शहरांत 32 रुपये कमावणारा गरीब नाही. ज्यांचे विचार असे आहेत ते गरीबांचे काय भले करणार? हे तर गरीबांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.’
आता काँग्रेसने संधी साधली
या निमित्ताने काँग्रेसला मोदींवर टीका करण्यास संधी मिळाली. पक्षाचे सरचिटणीस दिग्विविजयसिंह यांनी ट्विटवर म्हटले की, ‘मोदींना वाटते की 11 रुपये कमावणारा गरीब नाही. यावर राजनाथ सिंह सुषमा स्वराज’ काही बोलतील काय?.’ गुजरात रेशन डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष व नरेंद्र मोदींची बंधू प्रल्हाद यांनीही मोदींवर टीका केली आहे. ते म्हणतात,‘वातानुकुलित खोल्यांमध्ये बसून अधिकारी सरकारला अपेक्षित असलेले आकडे देऊन धोरण ठरवतात, अशा शब्दांत प्रल्हाद यांनी मोदी सरकारचा समाचार घेतला.