आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबादेत अल्पवयीन मुलाने कारने सात जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - एका 14 वर्षीय मुलाने कारने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडल्याचा प्रकार पहाटे घडला. या दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून इतर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्वांना स्थानिक रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा अल्पवयीन मुलगा सुमारे ताशी 120 किमीच्या वेगाने गाडी चालवत होता. दानिलीमडा परिसरात पहाटे अडिच वाजेच्या सुमारास त्याने रसत्याच्या कडेला झोपलेल्या लोकांवर कार चढवली. त्यानंतर ही कार एका झोपडीत शिरली. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असून कार जप्त करण्यात आली आहे. हा मुलगा एकटा कार चालवत होता, असे पोलिसांनी सांगितले.
मृतांमध्ये एक 24 वर्षीय महिला आणि तिच्या दिराचा समावेश आहे. तर जखमीही त्यांच्याच कुटुंबातील सदस्य आहेत. मुलगा कार घेऊन कधी गेला याबाबत काहीही माहिती नसल्याचे या मुलाच्या आई वडिलांनी पोलिसांना सांगितले आहे.
फोटो : कारच्या धडकेने नुकसान झालेली झोपडी
पुढे पाहा, अपघातात नुकसान झालेली झोपडी आणि कारचे फोटो