आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ : बस दुर्घटनेमध्ये गुजरातचे १७ जण ठार, भाविक गोरखपूरला येत असतानाची घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काठमांडू - नेपाळमध्ये बुधवारी एका बस दुर्घटनेत १७ भारतीय भाविकांचा मृत्यू, तर २८ जखमी झाले. बसमध्ये गुजरातचे भाविक होते. पशुपतिनाथ मंदिराचे दर्शन करून गोरखपूरला परतत असताना ही घटना घडली. मृतांमध्ये ९ महिलांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाइकांविषयी संवेदना व्यक्त केली आहे.

बसमधून ४५ लोक प्रवास करत होते. त्यावर भारतीय नंबर प्लेट होती, अशी माहिती काठमांडूचे पोलिस प्रमुख विश्वराज पोखरेल यांनी दिली. घटनेत बस ३०० मीटर खोल जाऊन पडली. राजधानी काठमांडूपासून पूर्वेला सुमारे ७५ किलोमीटर अंतरावरील ढाडिंग जिल्ह्यात नौबिसे गावापासून जाणा-या त्रिभुवन महामार्गावर ही घटना घडली. १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमींना काठमांडूच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.