आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका बोलेरो कारमध्ये भरले होते 35 प्रवाशी; टायर फुटून 2 महिला जागीच ठार, 30 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच बोलेरोमध्ये 35 प्रवाश्यांना कोंबले होते. - Divya Marathi
एकाच बोलेरोमध्ये 35 प्रवाश्यांना कोंबले होते.
राजकोट - गुजरातच्या छापरी गावात एकाच बोलेरो कारमध्ये तब्बल 35 प्रवाशी भरून प्रवास करणे 2 जणांच्या जिव्हारी बेतले आहे. अचानक वाहनाचे टायर फुटल्याने 2 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच इतर 5 जण गंभीर जखमी झाले. एका आश्रमात सेवा करून परत येत असताना हा प्रकार घडला. या वाहनात आणि जखमी झालेल्यांमध्ये सुद्धा प्रामुख्याने महिलांचाच समावेश आहे. 
 
 
जखमींसाठी बोलावल्या 6 रुग्णवाहिका
खांभा येथील एका आश्रमातून सेवा देऊन एक बोलेरो कार परत येत होती. कारमध्ये 35 जणांना अक्षरशः कोंबून भरण्यात आले होते. राजकोटपासून काही अंतरावर महुआ तालुक्याजवळ कार पोहचली असताना अचानक टायर फुटले. टायर फुटताच कारने दोन पलट्या घेतल्या. यात 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला. यासोबतच, जखमी झालेल्या 30 जणांपैकी 5 जणांची परिस्थिती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, एका बोलेरोमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना अपघातानंतर रुगणालयात घेऊन जाण्यासाठी 6 रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या होत्या.