आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: आगीनंतर 20 सिंहांना जंगलातून सुरक्षित स्थळी हलवले, सिंह अचानक रस्त्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा - गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातील सरसिया जंगलात आग लागल्यानंतर तेथील २० सिंहांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती वन विभागाचे उपसंरक्षक (डीएफओ) टी. कृप्पासामी यांनी वृत्तसंस्थेला दिली.   
 
कृप्पासामी म्हणाले की, शनिवारी सायंकाळी ७ वाजता आग लागली. आमच्या विनंतीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी अग्निशमन दलाला पाठवले. त्यांनी एक तासात आग आटोक्यात आणली. आमच्या पथकाने सिंहांना सुरक्षित स्थळी हलवले. ही आग २ किमी परिसरात पसरली होती. या भागात वन्यप्राण्यांची मोठी संख्या आहे. आगीचे कारण अद्याप समजले नाही.   
 
वन आणि पोलिस विभागाचे अधिकारी-कर्मचारी वन विभागातील अवैध अतिक्रमणे हटवत होते. त्याच वेळी आग लागल्याचे या पथकाच्या लक्षात आले. या अधिकाऱ्यांनी मग किमान २० सिंहांना तत्काळ घटनास्थळाहून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी पावले उचलली.   
 
राज्यात तीन जिल्ह्यांत एकूण ५२३ सिंह: २०१५ च्या गणनेनुसार गुजरातच्या जुनागढ, अमरेली आणि भावनगर या तीन जिल्ह्यांत एकूण ५२३ सिंह आहेत.   

गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात सिंह रस्त्यावर फिरत असल्याचे दूरचित्रवाणी वाहिनीवरील वरील दृश्य. सुमारे २० सिंह अचानक रस्त्यावर आल्यानंतर पाहणाऱ्यांची पाचावर धारण बसली होती.
 
बातम्या आणखी आहेत...