आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2002 Riots: Former Gujarat Minister Maya Kodnani Granted Bail

नरोडा पटिया दंगल : माया कोडनानी यांना जामीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - उच्च न्यायालयाने नरोडा पटिया दंगल प्रकरणातील दोषी माजी मंत्री माया कोडनानी यांचा जामीन मंजूर केला आहे. 2002 मधील या दंगलीत 97 जणांचा मृत्यू झाला होता. कोडनानी यांना याप्रकरणी 28 वर्षांची शिक्षा झाली आहे. न्या. व्ही. एस. सहाय आणि न्या. आर. पी. ढोलारिया यांनी वैद्यकीय आधारावरील जामीन अर्ज मंजूर केला. नरोडा प्रकरणात जामीन मिळणार्‍या कोडनानी पहिल्या आरोपी ठरल्या आहेत. त्यांना एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मिळाला. प्रकृतीच्या कारणावरून त्यांना पोलिसांसमोर हजर राहण्यापासून सूट देण्यात आली आहे.