आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये शाळकरी मुलांच्या पोटावरुन चालले भाजप उमेदवार, व्हिडिओ व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट - आधीच अनेक संकटामध्ये सापडलेला भारतीय जनता पक्ष आता आणकी एका नेत्याच्या कारनाम्याने अडचणीत आला आहे. राजकोट येथून भाजपचे लोकसभेचे उमेदवार मोहन कुंदरिया एका व्हिडिओमध्ये शाळकरी मुलांच्या पोटावरुन चालताना दिसतात. एका कार्यक्रमाचा हा व्हिडिओ यु-ट्यूबवर व्हायरल होत आहे. काही तासांमध्येच शेकडो लोकांनी त्याला पाहिले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, हा व्हिडिओ आर्य समाजाच्या वतीने आयोजित योग शिबीराचा आहे.
व्हिडिओमध्ये भाजप उमेदवार कुंदरीया मुलांच्या पोटावर चालून झाल्यानंतर दोन मुलांच्या पाठीवर उभे राहिलेले दिसतात. या व्हिडिओच्या बचावात आता सांगितले जात आहे, की योगा शक्तीच्या बळावर मुले किती वजन उचलू शकतात हे यातून दाखवण्याचा प्रयत्न होता. मुलांच्या पाठी-पोटावर नाचणारे भाजप उमेदवार कुंदरीया यांच्यासह व्हिडिओमध्ये आर्य समाजाचे कार्यकर्ते तिरंगा आणि भगवा ध्वज फडकविताना दिसत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, कुंदरिया म्हणाले, कार्यकर्त्यांचा आग्रह मोडू शकलो नाही