आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमध्ये जोरदार पावसाने पूरसदृश्य स्थिती, 27 ठार, 400 गावांना बेटाचे रुप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटण येथील रस्ते पूर्णपणे पाण्यात बुडालेले आहेत. - Divya Marathi
पाटण येथील रस्ते पूर्णपणे पाण्यात बुडालेले आहेत.
पाटण (गुजरात) - गुजरातमध्ये जोरदार पावसामुळे पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळे आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 48 तासांपासून होणाऱ्या पावसामुळे उत्तर गुजरातच्या चार जिल्ह्यांमधील 400 गांवांची स्थिती बेटांप्रमाणे झाली आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या बनासकांठा जिल्ह्याच्या लाखणी तहसीलमध्ये स्थिती सर्वात खराब आहे. येथे गेल्या 14 तासांत 21 इंच पाऊस झाला आहे.

एनडीआरएफची पथके पोहोचली, हेलिकॉप्टरद्वारेही मदत सुरू
बनासकांठाचे कलेक्टर प्रदीप राणा यांनी सांगितले की, मदत कार्यासाठी हेलिकॉप्टरची मदतही घेतली जात आहे. पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी एअरफोर्सचे हेलिकॉप्टर मागवण्यात आले आहेत. मदतकार्यासाठी एनडीआरएफची पथके याठिकाणी पोहोचली आहेत. बनासकांठाच्या वाव, धानेरा, दियोदर आणि भाभरमध्ये 17 इंचापर्यंत पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून गुजरातमध्ये पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्री जोरदार वाऱ्यांसह पाऊस झाला. सखल भागांमध्ये पाणीही साचले. अतिरिक्त आयुक्त एनडी मिस्त्री यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 1000 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

राजस्थानातही जोरदार पाऊस
गुजरातलाच लागून अशलेल्या राजस्थानच्या अनेक जिल्ह्यांमध्येही मंगळवारी पाऊस झाला. जालोरच्या सांचोरमध्ये जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे बाडमेरशी गुजरातचा संपर्क तुटला. बाडमेरहून येणारी शेकडो वाहने सांचोर-गुजरात मार्गावर अडकली आहेत. गुजरात मार्गावर चालणाऱ्या सरकारी आणि खासगी बसच्या फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. कलेक्टरने जिल्ह्यातील पावसाची स्थिती पाहता, नऊ ब्लॉकमध्ये बुधवारपर्यंत शाळांच्या सुट्या वाढवल्या आहेत. सिरोहीमध्ये एका जणाचा बूडून मृत्यू झाला तर दोघे अद्याप बेपत्ता आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पाटणमधील पूरस्थितीचे PHOTOS