आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन लाख लोक गाणार सामूहिक राष्ट्रगीत, १००८ कुंडांमध्ये होणार हवन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकोट- गुजरातेतील राजकोट जिल्ह्याच्या कागवट येथे कडवा पटेल (पाटीदारातील एक जात) कुलदेवी मंदिरातील खोडलधाम मंदिरात तीन लाख लोक २१ जानेवारीला सामूहिक राष्ट्रगीत गाणार आहेत. १७ जानेवारीपासून मंदिरात पाच दिवसांचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवात ५० लाख लोक सहभागी होतील. हा विक्रम गिनीज बुकात नोंद होईल. दुसरा विक्रम १००८ कुंडांत हवन करण्याचा होईल. मंदिराच्या प्रवेशद्वारावर तिरंगा फडकवण्यात येईल. खोडलधामचे विश्वस्त हंसराज गजेरा यांनी सांगितले, आशिया बुकमध्ये पहिला विक्रम खोडल रथाच्या फिरण्याचा आहे. दीड वर्षापासून हा रथ ४५२ तालुके तसेच ३५०० हून अधिक गावांत फिरला आहे.  
बातम्या आणखी आहेत...