आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTO- प्रियकरास भेटण्यास गेलेल्या तरूणीची 4 टवाळखोरांनी केली हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबादः मकर संक्रांतीच्या सणाच्या वातावरणात नारणपूरा क्रॉसिंगजवळ चार व्यक्तींनी एका तरूणीवर बलात्काराचा प्रयत्न केल्यानंतर तिची निर्घूण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. 4 जणांनी तरूणी आणि तिच्यासोबत असलेल्या तरूणावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात तरूणीचा घटनास्थळावरच मृत्यू झाला, तर तरूणाची प्रकृती गंभीर आहे.

या तरूण-तरूणीवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. गंभीर जखमी झालेल्या तरूणाने 100 क्रमांकावर फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी 108 क्रमांकाच्या मदतीने सोला शासकीय रुग्णालयात दोघांना भरती केले. मात्र रुग्णालयात पोहोचवण्याआधीच तरूणीचा मृत्यू झाला होता. तर तरूणाची प्रकृती खुपच गंभीर होती. मृत्यू झालेल्या तरूणीचे नाव वंदना प्रसाद असून ती वेरावलय येथील रहिवाशी होती. तर तरूणाचे नाव बिरबल प्रसाद असून तो महा्ट्रातील रहिवाशी आहे. बिरबल वंदनाला भेटण्यासाठी अहमदाबादला आला असताना हा हल्ला झाला.

वंदना आणि बिरबल रेल्वे क्रॉसिंगजवळील झुडूपांमध्ये बसले होते. तेव्हा अचानक 4 व्यक्ती तेथे आले आणि त्यांनी वंदनासोबत अश्लिल चाळे करण्यास सुरूवात केली. बिरबलने स्वतःला आणि वंदनाला वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरू केला. तेव्हा हल्लेखोरांनी दोघांवर चाकू हल्ला केला.

बिरबल मुंबईत नोकरी करत असून 9 महिन्यांपूर्वी त्याची आणि वंदनाच्या साखरपुड्याची चर्चा सुरू होती. मात्र वंदनाच्या वडिलांनी या साखरपुड्याला नकार दिला. कुटुंबातून विरोध असतानाही वंदना आणि बिरबल एकमेकांच्या संपर्कात होते.

पुढील स्लाईडवर पाहा, या घटनेची इतर छायाचित्रे...