आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारु पिऊन टल्ली झाल्या या बकर्‍या; झिंग उतरवण्यासाठी मालकाने पाजला मठ्ठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: दारुच्या नशेत टल्ली झालेल्या बकर्‍या)
खेरालु (गुजरात)- दारु बंदी असलेल्या गुजरातमध्ये मंगळवारी (17 मार्च) एक अनोखी घटना घडली. 40 बकर्‍यांचा कळप दारु पिऊन टल्ली झाला. झिंगलेल्या बकर्‍यांना सावरर्‍यासाठी मालकाने त्यांना बांधून ठेवावे. एवढेच नव्हे तर झिंग उतरवण्यासाठी प्रत्येक बकरीला मठ्ठा पाजण्यात आला.
प्रशासनाने या घटनेची दखल घेतली असून दारु बंदी असलेल्या राज्यात बकर्‍यांनी दारु पिलीच कशी? असा सवाल उपस्थित झाला आहे. याप्रकरणी प्रशासनाने पोलिसांना स्पष्‍टीकरण मागितले आहे.
मिळालेली माहिती अश‍ी की, मंगळवारी पोलिसांनी खेरालू गावात छापेमारी करून अवैध दारु नष्ट केली होती. कारवाईत दारुच्या बाटल्या फोडण्यात आल्या. त्यामुळे बाटल्यांमधील दारुचे जमिनीवर छोटे- छोटे डपके साचले. शेतात चरण्यासाठी आलेल्या बकण्‍यांनी या डपक्यांमध्ये साचलेली दारु पिली. काही क्षणात दारुची नशा चढल्यानंतर काही बकर्‍या बेशुद्ध पडल्या तर काही बकर्‍या टल्ली होऊन सौरावेरा धावत सुटल्या.
बकर्‍यांचे मालक रमेशभाई मगनभाई पाटणी यांनी सांगितले की, दारु पिऊन टल्ली झालेल्या बकर्‍यांना मठ्‍ठा पाजण्यात आला. नंतर कुठे एकेक करून सगळ्या बकर्‍या सुस्थितीत आल्या. प्रांताधिकारी एन.एस.गढवी यांनी सांगितले की, सुदैवाने एकही बकरी दगावली नाही. पोलिसांना अवैध दारु नष्ट करून तिची योग्य पद्धतीने विल्लेवाट लावण्याचे आदेश दिले आहेत. परंतु पोलिसांनी आपल्या कामात कसूर ठेवल्याने हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, दारुच्या नशेत टल्ली झालेल्या बकर्‍या आणि अवैध दारु नष्ट करताना पोलिस कर्मचारी...