आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी मरीन एजन्सीने 42 मच्छीमारांचे केले अपहरण; बोट पोरबंदरची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोरबंदर- सहा बोटींसह ४२ मच्छीमारांचे पाकिस्तानी मरीन एजन्सीने अपहरण केले आहे. अपहरण करण्यात आलेली बोट पोरबंदरची असल्याचे सांगण्यात आले. पाकिस्तानी मरीन एजन्सीने ७ बोटींना घेरले होते. यातील एका बोटीचे इंजिन बंद पडल्याने तिला सोडून देण्यात आले. मागील ७ महिन्यांपासून ही पाचवी कारवाई आहे. मार्च -२०१७ मध्ये चार वेळा भारतीय मच्छीमारांचे अपहरण करण्यात आले होते. 

मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण होत असल्याने येथे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. पाकिस्तानकडून पकडण्यात आलेली बोट दीर्घ काळ परत केली जात नाही. यामुळे मच्छीमारांचे दुहेरी नुकसान होते. मार्च- २०१७ चार वेळा अपहरण केल्याने संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले असून दोन्ही देशांनी मच्छीमारांचे अपहरण रोखण्यासाठी कॉमन फिशिंग झोन तयार करावा, अशी सूचना करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...