आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमनाथ मंदिरास 51 किलो सोने दान करून या शिवभक्त कुटूंबाने पूर्ण केला संकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: विश्वप्रसिद्ध प्रथम ज्योर्तिलिंग सोमनाथ मंदिरात सोन्याचे दागिने अर्पण करणारे लाखी कुटुंबिय आणि इन्सेटमध्ये दागिने)

वेरावल (गुजरात)- विश्वप्रसिद्ध ज्योर्तिलिंग सोमनाथ मंदिरास एका शिवभक्त कुटुंबाने सुमारे 51 किलो सोन्याचे दागिने अर्पण करून आपला संकल्प पूर्ण केला आहे. मुंबई आणि सुरतमधील शिवभक्त लाखी कुटुंबाने गत वर्षी महादेवाचा गाभार्‍यात सोन्याचा डमरू, त्रिशूल आणि पाटासाठी सोने दान केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, लाखी कुटुंबियांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सोमनाथ मंदिरास 51 किलोग्रॅम सोन्याचे दागिने अर्पण करायचे होते. मात्र,पंतप्रधान मोदी यांना यावेळी उपस्थिती देणे शक्य झाले नाही. कार्तिक पोर्णिमामेच्या मुहुर्तावर लाखी कुटूंबाने उर्वरित 500 ग्रॅम सोन्याचे दागिने महादेवास अर्पण करून आपला संकल्प पूर्ण केला.

मंगळसूत्र, एक हार, दोन बांगड्यासह सोन्याचे दागिने महादेवास अर्पर्ण केले. सोमनाथ मंदिरात आयोजित महापूजेस लाखी कुटुंबातील सदस्यांसह सोमनाथ ट्रस्टचे अध्यक्ष पी.के. लहरी, व्यवस्थापक विजयसिंह चौरा यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येन उपस्थित होते.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, सोमनाथ मंदिराचे फोटो (सौजन्य: दिव्यभास्कर)