आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमाई महिना 300 रुपये, दान 52 कोटी; तीन तासांत जमले 108 कोटी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- एकेकाळी वल्लभभाई लखानी यांची दरमहा मिळकत होती केवळ 300 रुपये. घरात कोणी आजारी पडले तर उपचारासाठी उधार-उसनवारी करावी लागत होती. आता लखानी एका कंपनीचे चेअरमन आहेत. कोट्यवधींची कमाई आहे. सुरतमध्ये रुग्णालयाच्या उभारणीसाठी पैसे जमवणे सुरू झाले तेव्हा त्यांनी एका फटक्यात 52 कोटी रुपये दान दिले आहेत.

पाटीदार समाज मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करत आहे. पैसे जमवण्यासाठी समाजाने शनिवारी लोकगीतांचा कार्यक्रम घेतला. तीन तासांत दान म्हणून 108 कोटी रुपये मिळाले. लखानी यांच्याखेरीज लवजीभाई डालिया यांनी 8 कोटी आणि सुमारे 90 जणांनी प्रत्येकी 51 लाख रुपये दिले.

लखानी भावनगर जिल्हय़ातील भोजपरा गावातील आहेत. त्यांची किरण जेस प्रा. लि. ही कंपनी जगप्रसिद्ध हिरे कंपनी डीटीसीची साइट होल्डर आहे. कंपनीचे कार्य सुरतसह मुंबई, अँटवर्प आणि हाँगकाँगमध्येही आहे. कंपनीची वार्षिक उलाढाल 4,500 कोटी आहे