आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब गजब, वडीलांशी केले मेहुणीचे लग्न, लहान बहिण झाली मोठीची सासू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- लग्नानंतर रामचरण इंदौरा आणि त्यांची दुसरी पत्नी सुमित्रादेवी.)
महेसणा (गुजरात)- आयुष्यात आलेला एकाकीपणा घालवण्यासाठी येथील 77 वर्षीय रामचरण इंदौरा यांनी लग्न केले. आता याचे काही विशेष राहिले नाही. अनेक ज्येष्ठ व्यक्ती जोडीदाराच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न करताना दिसून येतात. पण इंदौरी यांच्या लग्नात असा अजब गजबपणा आहे, की त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांनी चक्क मुलाच्या मेहुणीसोबत लग्न केले. आता त्यांची पत्नी लहान बहिण असतानाही मोठ्या बहिणीची सासू झाली आहे. विशेष म्हणजे त्यांचा मुलानेत हे नाते जुळवून आणले आहे.
रामचरण इंदौरा यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव सुमित्रादेवी आहे. लग्नाला होकार देण्यासाठी सुमित्रादेवी यांनी बराच कलावाधी घेतला. पण अखेर त्यांचा नकार होकारात बदलला.
आता इंदौरीया कुटुंबातील नवीन मां मोठ्या मुलापेक्षा पाच वर्षांनी लहान आहे. रामचरण म्हणतात, हे नवीन नाते अजब गजब आहे. पण आमच्या घरातील वास्तव आहे. मला माहित नाही, की मी किती वर्षे जगणार. पण कसा जगणार हे माहित आहे. आयुष्यातील या टप्प्यात पुत्रवधुंच्या मदतीने जिवन जगण्यापेक्षा साथिदाराच्या सानिध्यात जगणे मला भावले. त्यामुळे मी होकार दिला.