आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातमधील या गावात मुक्तसंचार करताना दिसले 8 सिंह, व्हिडिओ झाला VIRAL

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गुजरातमधील जूनागड जिल्ह्यातील एका गावात दोन दिवसांपूर्वी रात्री 8 सिंह मुक्त संचार करताना दिसले. हे वृत्त वार्‍यासारखे पसरल्याने परिसरातील लोकांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. लोक रात्रीच काय तर दिवसाही घराचे दारे-खिडक्या बंद करून बसतात. सिंहाच्या मुक्त संचाराचा व्हिडिओ वॉट्सअॅपवर सर्कुलेट झाल्याने वातावरण आणखीच तणावपूर्ण झाले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?
- अहमदाबादपासून 300 किलोमीटर अंतरावर जूनागड जिल्हा आहे. जवळच गिर हे अभयारन्य आहे. सिंहासाठी ते प्रसिद्ध आहे.
- मंगळवारी (12 जुलै) रात्री 8 सिंह गावात मुक्तसंचार करताना दिसले. त्यात दोन बछड्यांचा समावेश होता.
- एका व्यक्तीने या सिंहाचा व्हिडिओ शूट केला. नंतर हा व्हिडिओ वॉट्सअॅप शेअर झाला आहे. पण, गावाचे नाव समजले नाही.
- हे वृत्त वार्‍यासारखे पसरताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गिर अभयारन्यात सर्वाधिक सिंह...
- गुजरातमधील गिर अभयारन्य सिंहासाठी प्रसिद्ध आहे.
- गिर अभयारन्याने जूनागड जिल्ह्यातील सासनमधील जवळपास 1412 वर्ग किलोमीटर परिसर व्यापला आहे.
- जगात सिंहाची संख्या घटत आहे, पण गिर अभयारन्यात सिंहाची संख्या सारखी वाढत आहे.
- गणनेनुसार, 2010मध्ये गिर अभयारन्यात 411 सिंह होते. सद्यस्थितीत ही संख्या 523 वर पोहोचली आहे.

पुढील स्लाइडवरील पाहा मुक्तसंचार करणार्‍या 8 सिंहाचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...