आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 8th Class Student Suicide In Surat News In Marathi

शिक्षकाच्या मारहाणीने 8 वीच्या चिमुकल्याची आत्महत्या, माऊलीचा हृदयद्रावक आक्रोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- चिमुकल्याचा मृतदेह बघितल्यावर आक्रोष करताना त्याची आई.)
सूरत (गुजरात)- येथील आरटीओ कार्यालयाजवळ राहणाऱ्या आठवीत असलेल्या चिमुकल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 14 वर्षिय या चिमुकल्याचे नाव हर्ष आहे. पीटी शिक्षकाच्या मारहाणीमुळे मानसिक नैराश्य आलेल्या या चिमुकल्याने सुसाईड नोटही लिहिली आहे. यात त्याने वडिलांना सांगितले आहे, की तुम्ही अर्जून सरांना कानाखाली 10-20 वेळा जाळ काढा. ही माझी अंतिम इच्छा आहे.
कुशल वाटिका सोसायटीतील जीतूभाई यांचा मुलगा हर्ष अडाजण पोलिस ठाण्यासमोर असलेल्या एमएनबी शाळेत आठव्या वर्गात होता. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता तो घरी आला. ड्रेस बदलून जेवण केल्यानंतर त्याच्या खोलीत गेला. त्याने दार आतुन लावून घेतले. असे तो दररोज करीत असे. यावेळी घरी हर्षची आई चेतनाबेन होती. त्यांना वाटले होते, की हर्ष बेडरुममध्ये होमवर्क करीत आहे.
परंतु, तीन वाजले तरी हर्ष खोलीतून बाहेर आला नाही. त्यामुळे त्यांनी त्याला आवाज दिला. पण वारंवार आवाज देऊनही त्याने दार उघडले नाही. अखेर त्याच्या वडीलांना बोलविण्यात आले. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार तोडले.
त्यानंतर आतील दृष्य बघून जीतूभाई आणि चेतनाबेन यांना भोवळच आली. हर्षने पंख्याला दोरी बांधून आत्महत्या केली होती. त्याला लगेच रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सायंकाळी खोलीची तपासणी केल्यावर त्याच्या कॉम्प्युटरजवळ त्याच्या हस्ताक्षरात सुसाईड नोट मिळाली. त्यात त्याने शाळेतील पीटी शिक्षक अर्जुन यांचा उल्लेख केला आहे. हे सर त्याला दररोज काही ना काही कारणाने रागावत किंवा मारत होते. यामुळे हर्ष मानसिक नैराश्यात गेला होता.
हर्षने आत्महत्या करताना हातावर शिक्षकाचे नाव लिहिले होते. त्याने सुसाईड नोटमध्ये वडीलांना सांगितले आहे, की तुम्ही अर्जून सरांना 10-20 वेळा कानाखाली वाजवा. ही माझी अंतिम इच्छा आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, हर्षने लिहिलेली सुसाईड नोट....हातावर शिक्षकाचे नाव...