आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 5 Family Members Dies In Cylinder Blast, Jaipur & 3 Girls Burnt Alive In Katha Shibir

राजकोट येथे राष्ट्रकथा शिबिरात भीषण आग, तीन मुलींचा मृत्यू; 47 तंबू जळाले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राष्ट्रीय कथा शिबीराला राजनाथसिंह यांनीही भेट दिली होती. - Divya Marathi
राष्ट्रीय कथा शिबीराला राजनाथसिंह यांनीही भेट दिली होती.

राजकोट- गुजरातमधील राजकोट येथे देशभक्तीचा संदेश देण्यासाठी आयोजित राष्ट्रकथा शिबिरात शुक्रवारी रात्री उशिरा आग लागली. या आगीत तीन विद्यार्थिनींचा जळून मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाल्या आहेत. एक आठवड्यापूर्वी सुरू झालेल्या स्वामी धर्मबंधू महाराजांच्या या शिबिराचा शनिवारी समारोप होता. यात सुमारे १२ हजार लोकांनी सहभाग घेतला होता.

  
शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे विद्यार्थिनींच्या तंबूमध्ये आग लागली. या आगीचे स्वरूप इतके भीषण होते की, इतर तंबूंमध्येही आग पसरली. सुमारे ४७ छावण्या जळून खाक झाल्या. या आगीत मोरबीच्या कृपाली दवे, सायला येथील वनिता जमोड व जसदन येथील किंजल यांचा मृत्यू झाला. १३ विद्यार्थिनी गंभीर भाजल्या गेल्या आहेत. 


 या सर्व विद्यार्थिनींचे वय १६ ते १७ वर्षे आहे. पाच गंभीर विद्यार्थिनींना राजकोटला उपचारासाठी पाठवण्यात आले अाहे. घटनास्थळी निमलष्करी दलाच्या जवानांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले. खूप परिश्रम घेऊन तीन ते चार तासांनी आग आटाेक्यात आणली. दरवर्षी होणाऱ्या या शिबिरात याआधीही सचिन तेंडुलकर यांसारख्या नामवंत क्रिकेटपटूंसह अनेक दिग्गजांनी सहभाग घेतलेला होता.  

 

जयपूर- एलपीजी गॅस सिलिंडरचा स्फोट, ५ जण ठार

राजस्थानातील जयपूर येथे एलपीजी गॅस सिलिंडरची गळती होऊन झालेल्या स्फोटात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. ही घटना जयपूरमधील विद्याधरनगरात शनिवारी सकाळी घडली. 


गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने तळमजल्यावर लागलेल्या आगीत झोपेत असलेले तिघेजण जळाले, तर दुसऱ्या मजल्यावरील दोघांचा धुरात गुदमरून मृत्यू झाला, अशी माहिती अतिरिक्त उपायुक्त राजेश मील यांनी दिली. 


मृतांची नावे महेंद्र गर्ग (७५), शौर्य गर्ग (२५), अनिमेश गर्ग (२२), अपूर्वा गर्ग (२४) आणि अर्पिता गर्ग(२०)अशी त्यांची नावे आहेत. अनिमेश व शौर्य हे पहिल्या मजल्यावर होते. या घराचे मालक संजीव गर्ग पत्नीसह बाहेरगावी गेले आहेत. त्यांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, जयपूर येथे घरातील सिलिंडर स्फोटानंतर भिंतीचा झाला कोळसा... 

बातम्या आणखी आहेत...