आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • शॉकिंग Video: पत्नीने दुसऱ्याशी संबंध ठेवायला नकार दिल्याने पती सासूने केली एवढी बेदम मारहाण: Ahmedabad: CCTV Footage Of Husband Badly Beaten Front Of Child

शॉकिंग Video: पत्नीने दुसऱ्याशी संबंध ठेवायला नकार दिल्याने पती-सासूने केली एवढी बेदम मारहाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद, गुजरात - एका विवाहितेला तिच्या लहान मुलासमोर पती आणि सासूने बेदम मारहाण केली. मुलगा आईला वाचवण्यासाठी तिला बिलगून उभा राहिला, परंतु बाप आणि आजीने लाथा-बुक्क्याने मारले. दरम्यान, आईसोबत मुलगाही फरपटत गेला. या लाजिरवाण्या घटनेचा VIDEO सोशल मीडियावर आल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया आल्या आहेत. दुसरीकडे, पोलिसांनी सासूला अटक केली असून पती फरार आहे.  

 

आपले काम काढून घेण्यासाठी पत्नीच्या देहाचा सौदा करून आला होता...
- पीडितेने आरोप केला आहे की, पती तुषार त्रिवेदीने आपले काहीतरी काम काढून घेण्यासाठी गांधीनगरच्या शुक्ला नावाच्या एका अधिकाऱ्याशी अवैध संबंध बनवण्याचा दबाव टाकला. तिने जेव्हा नकार दिला, तेव्हा त्याने बेदम मारहाण केली.
-महिलेला तिच्या 4 वर्षांच्या मुलासमोर फरपटत नेऊन बेदम मारहाण केली. महिलेचा आरोप आहे की, तिने यापूर्वीही 2-3 वेळा पोलिसांत तक्रार दिली, परंतु कोणतीही सुनावणी झाली नाही. जर वेळीच पोलिसांनी तिची अडचण ऐकली असती, तर पुन्हा तिच्यावर अशी वेळ नसती.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...