आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांनी हाताने पकडला साप, फेसबूकवर पोस्ट केला Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीनगर - गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते परेश धनानी यांनी विषारी सापासोबतचा एक व्हिडिओ आपल्या फेसबूक अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा साप एक रसेल वायपर असून तो त्यांच्या गांधीनगर येथील शासकीय निवासस्थानी सापडला होता. हा साप त्यांनी आपल्याच हाताने पकडला आणि बाहेरही काढले. त्यांच्या घरात मंगळवारी ही घटना घडली. परेश यांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबूक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केला आहे. परेश धनानी गुजरात विधानसभेत विरोधी पक्षाचे नेते आहेत. 


हा व्हिडिओ धनानी यांच्या एका स्टाफ मेंबरने शूट केला आहे. त्यामध्ये धनानी सापाला हातात धरून नियंत्रित करताना दिसत आहेत. त्यांची शैली पाहून ते सापावर पकडण्यात जणू एक्सपर्ट असल्याचे वाटत होते. त्यांनी व्हिडिओला गुजराती भाषेत एक कॅप्शन सुद्धा दिले आहे. त्यानुसार, हा रसेल वायपर साप आहे. हा साप रस्ता भटकून माझ्या घरात शिरला होता. पण, मला साप पकडता येतो. यानंतर काँग्रेस नेत्याने साप जवळच्या एका जंगलात नेऊन सोडल्याचे त्यांच्या स्टाफने सांगितले आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...