आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 भावांच्या डबल मर्डरचा LIVE व्हिडिओ, भयंकर होते निर्घृण हत्येचे दृश्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - येथील गोंडल रोडवर रविवारी सकाळी 2 भावांवर त्यांच्याच कुटुंबातील भाऊ-पुतणे धारदार शस्त्रे घेऊन तुटून पडले. त्यांनी भरदिवसा त्यांची हत्या केली. यामुळे पूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. या पूर्ण घटनेला एकाने आपल्या मोबाइलवर चित्रित केले. या भावांमध्ये मागच्या 15 वर्षांपासून विवाद सुरू होता, याचा अंत दोन हत्यांनी झाला. 

 

सकाळी सुरू झाला तो खुनी खेळ...
शहराच्या गोंडल रोडवर रसुलपारामध्ये राहणारे जेसिंगभाई मेराभमभाई शियाडिया(45) आणि त्यांचा मावसभाऊ वेजाभाई खीमाभाई अलोगतर (35) रविवारी सकाळी साडेसात वाजता कोठारिया सालवेंटच्या चौकाजवळ उभे होते, तेवढ्यात तेथे त्यांच्या कुटुंबातील  भाई वरजांग शियाडिया, भाई नवधण वरजांग, लाला ऊर्फ विशाल मेला आणि करण ऊर्फ गीगो वरजांग तलवार-चाकू घेऊन पोहोचले. चौघांनी मिळून वरजांग यांच्यावर हल्ला चढवला. त्यांच्या शरीरावर सतत वार करणे सुरू केले. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या मावसभावालाही हल्लेखोरांनी सोडले नाही. त्यांच्यावरही घातक शस्त्रांनी प्रहार करणे सुरू केले. दिवसाढवळ्या तरुणांवर हल्ला होताना पाहून आसपासच्या परिसरात दहशत पसरली. दोन्ही भावांना रक्तबंबाळ करून चारही हल्लेखोर तेथून पळून गेले.

 

रुग्णालयात पोहोचण्याआधी एकाने दम तोडला...
लोकांनी जखमी दोन्ही भावांना रुग्णालयात नेण्याची तयारी केली. यापूर्वी जेसिंग भाईचा मृत्यू झाला होता. नंतर उपचारादरम्यान वेजाभाईने दम तोडला. पोलिसांनी जेसिंगभाई यांचा मुलगा लक्ष्मणभाई यांच्या तक्रारीवरून चारही हल्लेखोरांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे फोटोज व शेवटच्या स्लाइडवर व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...